अमरावती : प्रशांत वानखडे यांचा युवा स्वाभिमान संघटनेत प्रवेश
अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.) | महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीत ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, सलग २५ वर्ष अमरावती महानगरपालिकेत नगरसेवक राहिलेले ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते प्रशांत वानखडे यांनी युवा स्वाभिमान संघटनेत जाहीर पक्षप्र
मनपा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का २५ वर्ष नगरसेवक राहिलेले ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते प्रशांत वानखडे यांचा युवा स्वाभिमान संघटनेत प्रवेश


अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.) | महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीत ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, सलग २५ वर्ष अमरावती महानगरपालिकेत नगरसेवक राहिलेले ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते प्रशांत वानखडे यांनी युवा स्वाभिमान संघटनेत जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

प्रशांत वानखडे हे अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक काळ नगरसेवक राहिलेले ठाकरे गटाचे नेते मानले जातात. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी मनपा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडीमुळे ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पक्षप्रवेशावेळी आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका करत, “अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचे काम युवा स्वाभिमान संघटना करेल,” असा स्पष्ट इशारा दिला. युवा स्वाभिमान संघटना शहरातील सर्व प्रभागांमध्ये ताकदीने मैदानात उतरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना प्रशांत वानखडे म्हणाले की, “ठाकरे गट पूर्णपणे नेतृत्वहीन झाला आहे. कार्यकर्त्यांसाठी कोणतेही ठोस नेतृत्व राहिलेले नाही. त्यामुळे सामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या युवा स्वाभिमान संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.” त्यांनी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

या पक्षप्रवेशामुळे अमरावतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, महानगरपालिका निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. युवा स्वाभिमान संघटनेची ताकद या प्रवेशामुळे वाढली असून, ठाकरे गटासाठी ही घडामोड मोठा धक्का मानली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande