अमरावती: पोलीस आयुक्तांनी घेतला ट्रॅफिक व्यवस्थेचा आढावा
अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.)। शहराच्या मुख्य बाजारपेठेत अनेक दिवसांपासून वाहतुकीची समस्या आहे. या अनुषंगाने नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी शहरातील सर्व पोलिस स्टेशन परीसरातील विविध भागांचा आढोवा घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी संध्याकाळ
सीपी ओला ऑन रोड, ट्रॅफिक व्यवस्थेचा आढावा  स्थानिक व्यापारी - ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या


अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.)।

शहराच्या मुख्य बाजारपेठेत अनेक दिवसांपासून वाहतुकीची समस्या आहे. या अनुषंगाने नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी शहरातील सर्व पोलिस स्टेशन परीसरातील विविध भागांचा आढोवा घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी संध्याकाळी सीपी राकेश ओला यांनी स्वतःऑन रोड शहरातील वाहतुकीचा आढावा घेतला. त्यांनी मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वाहतूक पोलिस आणि पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिशानिर्देश देत मार्गदर्शन केले.गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पोलिस आयुक्त राकेश ओला अचानक शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्याम चौकात पोहोचले. तेथून ते चित्रा चौक, टांगापाडव चौक आणि सरोज चौकातून पायदळ चालत जयस्तंभ चौकात पोहोचत वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.राजकमल रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने गेल्या काही महिन्यांपासून दररोज विविध वाहतूक समस्या निर्माण होत आहेत.विशेषतः सणांच्या काळात रस्त्यांवर वाहतूककोंडी होते. वाहतूक व्यवस्थाकशी सुरळीत करता येईल, याबाबत सीपी ओला यांनी चर्चा केली. त्यानंतर सीपींनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये पोहोचून कामकाजाचा आढावा घेतला.

पार्किंग, नो पार्किंग समस्या

वाहतूक विभाग नियमितपणे नो पार्किंगविरुद्ध कारवाई करत असला तरी, शहरातील बहुतेक भागात पार्किंग सुविधा नसल्याने वर्षानुवर्षे परिस्थिती तशीच आहे. शिवाय, वाहतूक विभागाच्या कृतींबद्दल नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

पार्किंगच्या जागेत भटक्यांचा ठिय्या

राजकमल, राजापेठ दरम्यान उड्डाण -पुलाखाली त्यांची वाहने पार्क करत असत. परंतु गेल्या दोन वर्षांपासून, भटक्यांनी बहुतेक भागात वास्तव्य केले आहे. ते रस्त्यावर हंगामा करतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande