
अमरावती, 19 डिसेंबर, (हिं.स.)। महानगरपालिका क्षेत्रातील साईनगर (प्रभाग क्र. १९) परिसरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. बडनेरा, राजापेठ आणि खोलापुरी गेट या तीन पोलीस ठाण्यांच्या सीमेवर असलेली आणि गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेली राजापेठ पोलिस डाण्याची साईनगर पोलीस चौकी अखेर पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे.
साईनगर परिसर हा भौगोलिकदृष्ट्या तीन पोलीस ठाण्यांच्या सीमांना लागून असल्याने या ठिकाणच्या स्थानीय वसाहती तसेच इतर दुकानात चोरी, घरफोडी आणि इतर गुन्हेगारी कृत्यांचे प्रमाण वाढले होते. त्या मध्ये स्थानीय पोलिसांकडून क्षेत्रात कडक कारवाई करावी ही नागरिकांची मुख्य भूमिका होती तसेच हद्दीच्या वादाचा फायदा घेत गुन्हेगारांनी उच्छाद मांडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे. वातावरण होते. ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नागरिकांनी संघटित होऊन पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता.तोडगा काढण्यासाठी प्रभागाचे माजी नगरसेवक तुषार भारतीय तथा चेतन गावंडे सोबत नागरिकांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन पोलीस आयुक्त अरविद चावरिया यांची भेट घेऊन परिसरातील पाढा वाचला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी