गूगलने जेमिनी थ्री फ्लॅश एआय मॉडेल केला लाँच
मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)। टेक दिग्गज गूगलने आपल्या जेमिनी थ्री सिरीजमधील लेटेस्ट आणि वेगवान एआय मॉडेल जेमिनी थ्री फ्लॅश अधिकृतपणे रिलीज केले आहे. जेमिनी थ्री प्रो आणि जेमिनी थ्री डीप थिंक या मॉडेल्सनंतर अवघ्या महिनाभरात सादर करण्यात आलेल्या या नव
Gemini 3 Flash


मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)। टेक दिग्गज गूगलने आपल्या जेमिनी थ्री सिरीजमधील लेटेस्ट आणि वेगवान एआय मॉडेल जेमिनी थ्री फ्लॅश अधिकृतपणे रिलीज केले आहे. जेमिनी थ्री प्रो आणि जेमिनी थ्री डीप थिंक या मॉडेल्सनंतर अवघ्या महिनाभरात सादर करण्यात आलेल्या या नव्या फ्लॅश व्हेरिएंटमुळे युजर्स आणि डेव्हलपर्सना अधिक वेग, जास्त कार्यक्षमता आणि कमी टोकन खर्चाचा फायदा मिळणार आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, कोडिंगसारख्या कामांमध्ये जेमिनी थ्री फ्लॅश हे जेमिनी थ्री प्रो पेक्षा अधिक प्रभावी ठरत असून, संपूर्ण जेमिनी 2.5 सिरीजच्या तुलनेतही ते जास्त चांगली कामगिरी करते.

जेमिनी थ्री फ्लॅशच्या लाँचची घोषणा गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे केली आहे. हे मॉडेल Gemini अ‍ॅप, वेबसाइट तसेच सर्चमधील AI मोडद्वारे जगभरातील युजर्ससाठी हळूहळू रोलआउट केले जात आहे. डेव्हलपर्सना हे मॉडेल Google AI Studio, Gemini CLI आणि एजेंटिक डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म अँटीग्रॅव्हिटीमध्ये Gemini API च्या माध्यमातून वापरता येणार आहे. तर व्यवसायिक युजर्ससाठी हे Vertex AI आणि Gemini Enterprise द्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

‘फ्लॅश’ नाव असलेली गुगलची एआय मॉडेल्स कमी लेटन्सी आणि किफायतशीर वापरासाठी ओळखली जातात आणि जेमिनी थ्री फ्लॅश ही परंपरा पुढे नेत आहे. मात्र, यावेळी गुगलने या मॉडेलची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता आणखी वाढवली आहे. काही बाबतीत हे मॉडेल जेमिनी थ्री प्रो च्या बरोबरीचे किंवा त्याहूनही सरस ठरत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

इंटरनल मूल्यांकनानुसार, जेमिनी थ्री फ्लॅश ने GPQA डायमंड बेंचमार्कवर 90.4 टक्के, तर टूल्सशिवाय घेतल्या जाणाऱ्या ह्युमॅनिटीज लास्ट एग्जाममध्ये 33.7 टक्के स्कोअर मिळवला आहे. याशिवाय MMMU Pro बेंचमार्कवर 81.2 टक्के आणि SWE-bench Verified वर 78 टक्के कामगिरी नोंदवण्यात आली आहे. गुगलने असेही स्पष्ट केले की, अवघड प्रश्न विचारल्यास हे मॉडेल थोडा अधिक वेळ ‘विचार’ करते, मात्र Gemini 2.5 Pro च्या तुलनेत सरासरी 30 टक्के कमी टोकन्स वापरते. यामुळे मॉडेल अधिक कार्यक्षम ठरते आणि खर्चातही मोठी बचत होते.

किंमतीच्या बाबतीत जेमिनी थ्री फ्लॅश हे जेमिनी थ्री प्रो पेक्षा लक्षणीय स्वस्त आहे. या मॉडेलसाठी प्रति मिलियन इनपुट टोकनची किंमत 0.50 डॉलर म्हणजेच सुमारे 45 रुपये, तर प्रति मिलियन आउटपुट टोकनसाठी 3 डॉलर म्हणजेच सुमारे 271 रुपये ठेवण्यात आली आहे. ऑडिओ इनपुटसाठी प्रति मिलियन टोकन 1 डॉलर म्हणजेच जवळपास 90.5 रुपये आकारले जाणार आहेत. कमी खर्चात जास्त कार्यक्षमतेचा अनुभव देणारे जेमिनी थ्री फ्लॅश हे गुगलच्या एआय रणनीतीतील एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande