भारतामध्ये वनप्लसने १५आर स्मार्टफोन; पॅड गो २ टॅबलेट केला लाँच
मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)। वनप्लसने भारतासह जागतिक बाजारात आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस १५आर अधिकृतपणे लाँच केला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत असलेला हा फोन अखेर भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध झाला असून, याच इव्हेंटमध्ये कंपनीने वनप्लस
OnePlus 15R Smartphone and Pad Go 2 Tablet


OnePlus Pad Go 2 Tablet


मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)। वनप्लसने भारतासह जागतिक बाजारात आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस १५आर अधिकृतपणे लाँच केला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत असलेला हा फोन अखेर भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध झाला असून, याच इव्हेंटमध्ये कंपनीने वनप्लस पॅड गो २ हा नवा टॅबलेटही सादर केला आहे. मात्र, वनप्लस १५आर हा प्रीमियम परफॉर्मन्स, गेमिंग आणि मोठ्या बॅटरीमुळे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

वनप्लस १५आर दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 47,999 रुपये असून, ॲक्सिस बँक किंवा एचडीएफसी बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास तो 44,999 रुपयांमध्ये उपलब्ध होतो. तर 12GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 52,999 रुपये असून, बँक डिस्काउंटसह तो 47,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनचे प्री-ऑर्डर 17 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 8.30 वाजल्यापासून सुरू झाले असून, प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना वनप्लस नॉर्ड बड्स ३ मोफत दिले जात आहेत. फोनची ओपन सेल 22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.

डिझाइनच्या बाबतीत वनप्लस १५आर मध्ये वनप्लस १५ सारखीच प्रीमियम डिझाइन फिलॉसफी पाहायला मिळते. फोनचे कोपरे अधिक राउंडेड असून कॅमेरा बम्प तुलनेने कॉम्पॅक्ट ठेवण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यात अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंगसह येतो, त्यामुळे तो पाणी आणि धुळीपासून अधिक सुरक्षित आहे.

परफॉर्मन्ससाठी वनप्लस १५आर मध्ये 3nm टेक्नॉलॉजीवर आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन 5 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीनुसार हा चिपसेट खास वनप्लस १५आर साठी ऑप्टिमाइझ करण्यात आला असून, यामुळे CPU परफॉर्मन्समध्ये 36 टक्के, GPU मध्ये 11 टक्के आणि AI परफॉर्मन्समध्ये 46 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. Snapdragon 8 Gen 5 चिपसेटसह लाँच होणारा हा पहिला स्मार्टफोन असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. फोनमध्ये LPDDR5X Ultra RAM आणि UFS 4.1 स्टोरेज देण्यात आली आहे. उष्णता नियंत्रणासाठी 43,940 स्क्वेअर मिमीचा 360 Cryo Velocity Cooling System देण्यात आला असून, यात एरोजेल कूलिंग लेयर आणि 3D व्हेपर चेंबरचा समावेश आहे.

गेमिंग युजर्ससाठी वनप्लस १५आर मध्ये UAV ग्रेड जायरोस्कोप देण्यात आला आहे, जो 4000 DPS पेक्षा जास्त रेंजमध्ये काम करतो. यामुळे BGMIसारख्या शूटिंग गेम्समध्ये अधिक अचूक आणि स्मूथ अनुभव मिळतो, असा दावा कंपनीने केला आहे.

डिस्प्लेच्या बाबतीत फोनमध्ये 165Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये स्वतंत्र टच रिस्पॉन्स चिप असून, 3200Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट मिळतो. डिस्प्ले 1800 निट्स HBM ब्राइटनेस सपोर्ट करतो आणि Reduce White Point फीचरमुळे 1 निटपर्यंत कमी ब्राइटनेस मिळू शकतो. कनेक्टिविटी सुधारण्यासाठी खास Wi-Fi चिपही देण्यात आली आहे.

OnePlus 15R मध्ये 7400mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी आतापर्यंतच्या OnePlus फोनमधील सर्वात मोठी बॅटरी आहे. ही बॅटरी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे केवळ 23 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे. गेमिंगदरम्यान उष्णता कमी ठेवण्यासाठी बायपास चार्जिंग फीचरही देण्यात आले आहे.

कॅमेरा विभागात फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात OIS सपोर्टसह 50MP Sony IMX906 मुख्य कॅमेरा आणि 112 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन 4K 120fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करतो आणि OnePlus 15 मधील Detail Max Engine यामध्येही देण्यात आला आहे.

सॉफ्टवेअरच्या बाबतीत OnePlus 15R Android 16 आधारित OxygenOS 16 वर चालतो. यामध्ये होम स्क्रीन आणि लॉक स्क्रीनसाठी अधिक पर्सनलायझेशन पर्याय देण्यात आले आहेत. मोशन फोटो थेट डायनॅमिक लॉक स्क्रीन म्हणून सेट करता येते आणि इंस्टाग्राम वर थेट शेअर करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. एआय फीचर्समध्ये एआय रीकंपोज, एआय इरेजर, एआय परफेक्ट शॉट, एआय डिटेल बूस्ट, एआय अनब्लर, एआय रिफ्लेक्शन इरेजर, एआय पोर्ट्रेट ग्लो, एआय प्लेलॅबआणि Gemini पावर्ड Plus Mind यांचा समावेश आहे. हा फोन Charcoal Black, Mint Breeze आणि भारतासाठी खास Electric Violet या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

या इव्हेंटमध्ये वनप्लस पॅड गो २ हा नवा टॅबलेटही लाँच करण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 12.1 इंचाचा 2.8K रिझोल्यूशन डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 900 निट्स HBM ब्राइटनेस आणि 10,050mAh बॅटरी देण्यात आली आहे. लॉन्च ऑफर्ससह वनप्लस पॅड गो २ ची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. सुरुवातीच्या ऑफर मध्ये, वनप्लस ग्राहकांसाठी २,००० रुपयांची त्वरित बँक सवलत आणि १,००० रुपयांची मर्यादित कालावधीची सवलत देत आहे. यामुळे सुरुवातीची किंमत २३,९९९ रुपयांपर्यंत खाली येईल.

परफॉर्मन्ससाठी 4nm मीडियाटेक डायमेन्सिटी ७३००-अल्ट्रा चिपसेट दिला आहे, जो 8जीबी LPDDR5X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह जोडला गेला आहे. OxygenOS 16 (Android 16 आधारित) वर चालतो आणि AI फीचर्स जसं AI Writer, AI Recorder, AI Reflection Eraser यांचा समावेश आहे. यात 8MP रियर आणि फ्रंटला 8MP सेल्फी कॅमेरा आहे, जो व्हिडिओ कॉलिंग आणि बेसिक फोटोग्राफीसाठी पुरेसा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande