
परभणी, 20 डिसेंबर (हिं.स.)। मानवत तालुक्यातील रुढी येथून एक आणि शहरातील आंबेडकर नगरातून एक अशा दोन मुली घरातून गायब झाल्या आहेत. १९ डिसेंबरला त्यांच्या पालकांनी मिसिंग तक्रार दाखल केल्या.
रुढी येथून १८ वर्षे ७ महिन्याची मुलगी काहीही न सांगता ७ डिसेंबरला घरातून निघून गेली आहे. मुलीला वडील नसल्याने तिच्या आईने दहा-बारा दिवस पाहुण्यांकडे मुलीचा शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने तिच्या आईने मानवत पोलिस ठाण्यात मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार दिली. याचा तपास हवालदार अतुल पंचांगे करीत आहेत. दुसऱ्या घटनेत १८ डिसेंबरला दुपारी १२ वाजता आंबेडकर नगरातील १९ वर्षीय मुलगी घराबाहेर गेली ती परत आली नाही. १९ डिसेंबरला तिच्या वडिलांनी मानवत ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंद केली. तपास जमादार जावेद शेख हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis