सोलापूर - भातंबरे येथील हातभट्ट्यांवर कारवाई
सोलापूर, 20 डिसेंबर (हिं.स.)। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर, कुर्डुवाडी पथकांसह भरारी पथकाने गोपाळपूर (ता. पंढरपूर), इंदापूर (ता. बार्शी) येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारी वाहने पकडली. याशिवाय धाराशिव, वैराग पोलिसांच्या मदतीने भरारी पथकाने
सोलापूर - भातंबरे येथील हातभट्ट्यांवर कारवाई


सोलापूर, 20 डिसेंबर (हिं.स.)। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर, कुर्डुवाडी पथकांसह भरारी पथकाने गोपाळपूर (ता. पंढरपूर), इंदापूर (ता. बार्शी) येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारी वाहने पकडली. याशिवाय धाराशिव, वैराग पोलिसांच्या मदतीने भरारी पथकाने भातंबरे (ता. बार्शी) येथील हातभट्ट्यांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण १६ लाख ५१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात बनावट टोपणे देखील आहेत.

३१ डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथकांकडून अवैध दारू निर्मिती, वाहतूक, विक्री व साठ्यांवर कारवाई सुरु आहे. गुरुवारी पंढरपूरच्या पथकाने गोपाळपूरजवळ गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या साडेसातशे मिलीच्या ३७ बाटल्या आणि विदेशी मद्याची २५० टोपणे वाहतूक करणारी कार पकडली. दुसरीकडे कुर्डुवाडीच्या पथकाने बार्शीजवळील इंदापूर परिसरातून विदेशी मद्यांची टोपणे व अन्य मुद्देमाल जप्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande