रियलमी 16 प्रो सीरिज भारतात 6 जानेवारीला होणार लाँच
मुंबई, 20 डिसेंबर (हिं.स.)। रियलमी कंपनी आपली नवी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज भारतीय बाजारात सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. रियलमी 16 प्रो सीरिज येत्या 6 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता अधिकृतपणे भारतात लाँच होणार आहे. कंपनीने स्पष्ट केलं आहे की ह
Realme 16 Pro Series


Realme 16 Pro Series


मुंबई, 20 डिसेंबर (हिं.स.)। रियलमी कंपनी आपली नवी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज भारतीय बाजारात सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. रियलमी 16 प्रो सीरिज येत्या 6 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता अधिकृतपणे भारतात लाँच होणार आहे. कंपनीने स्पष्ट केलं आहे की ही सीरिज रिफाइंड डिझाइन आणि प्रगत पोर्ट्रेट फोटोग्राफीवर विशेष भर देणारी असेल. पर्यावरणपूरक दृष्टीकोनातून या सीरिजमध्ये बायो-बेस्ड ऑर्गेनिक सिलिकॉन फिनिशचा वापर करण्यात आला असून, हे मटेरियल टिकाऊ, त्वचेला अनुकूल आणि अँटी-बॅक्टेरियल असल्याचा दावा करण्यात आला आहे.

फोटोग्राफी प्रेमींसाठी ही सीरिज खास ठरणार असून, यामध्ये 200 मेगापिक्सेलचा पोर्ट्रेट मास्टर कॅमेरा देण्यात येणार आहे. रियलमी 16 प्रो आणि रियलमी 16 प्रो+ अशी दोन मॉडेल्स या सीरिजमध्ये अपेक्षित आहेत. जपानी डिझायनर नाओतो फुकासावा यांच्या सहकार्याने ही सीरिज डिझाइन करण्यात आली असून, ‘अर्बन वाइल्ड’ डिझाइन लँग्वेजचा वापर करण्यात आला आहे. निसर्ग आणि आधुनिक शहरी जीवन यांचा मिलाफ दर्शवणारा हा डिझाइन दृष्टिकोन असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

रियलमी 16 प्रो सीरिज चार प्रीमियम रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. मास्टर गोल्ड, मास्टर ग्रे, कॅमेलिया पिंक आणि ऑर्किड पर्पल असे हे रंग पर्याय असतील. यापैकी कॅमेलिया पिंक आणि ऑर्किड पर्पल हे भारतासाठी एक्सक्लुझिव्ह रंग असतील. फोनचं बॅक पॅनल प्लांट-बेस्ड स्ट्रॉपासून बनवण्यात आलं असून, पर्यावरणस्नेही वैशिष्ट्यांसोबत प्रीमियम फील देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लाँचच्या दृष्टीने, रियलमी 16 प्रो सीरिजसाठी फ्लिपकार्टवर आधीच डेडिकेटेड मायक्रोसाइट लाईव्ह करण्यात आली आहे. लाँचनंतर लगेचच ही सीरिज फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

लीक्स आणि चीनमधील TENAA सर्टिफिकेशननुसार, रियलमी 16 प्रो+ हे अधिक पॉवरफुल मॉडेल ठरणार आहे. या फोनमध्ये 6.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात येणार असून, त्याची रिझोल्यूशन 1.5K आणि 120Hz रिफ्रेश रेट असेल. 1.07 बिलियन रंगांचा सपोर्ट या डिस्प्लेमध्ये मिळेल. प्रोसेसर म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात येणार असून, त्याचा पीक क्लॉक स्पीड 2.8GHz असेल. हा फोन Android 16 वर आधारित Realme UI 7 सह येईल. कंपनीकडून तीन मोठे OS अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

बॅटरीबाबत बोलायचं झाल्यास, रियलमी 16 प्रो+ मध्ये 6,850mAh क्षमतेची बॅटरी असेल, जी 7,000mAh म्हणून मार्केट केली जाईल. यासोबत 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. कॅमेरा सेटअपमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात येणार असून, 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी विशेषतः ऑप्टिमाइझ करण्यात आला आहे. याशिवाय 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 3.5x ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येणार आहे.

एकूणच, रियलमी 16 प्रो सीरिज मिड-रेंज सेगमेंटमध्ये जोरदार स्पर्धा निर्माण करण्याची शक्यता असून, कॅमेरा, डिझाइन आणि बॅटरी लाइफ या बाबींमध्ये ही सीरिज मजबूत ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लाँचनंतर या सीरिजविषयी अधिकृत किंमत आणि इतर तपशील समोर येतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande