भारतात मोठ्या प्रमाणात एच-१बी व्हिसाच्या मुलाखती रद्द
नवी दिल्ली , 21 डिसेंबर (हिं.स.)।भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आधीच निश्चित करण्यात आलेल्या एच-1बी व्हिसा मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे अमेरिकेला जाणाऱ्या अनेक लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या मुलाखती पूर्वी डिसेंबरमध्ये ठ
भारतात मोठ्या प्रमाणात एच-१बी व्हिसाच्या मुलाखती रद्द


नवी दिल्ली , 21 डिसेंबर (हिं.स.)।भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आधीच निश्चित करण्यात आलेल्या एच-1बी व्हिसा मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे अमेरिकेला जाणाऱ्या अनेक लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या मुलाखती पूर्वी डिसेंबरमध्ये ठरवण्यात आल्या होत्या, त्या आता अनेक महिन्यांनंतरच्या तारखांसाठी पुन्हा निश्चित करण्यात आल्या आहेत.

मीडिया अहवालांनुसार, अमेरिकन सरकारच्या कठोर नियमांमुळे आणि सोशल मीडियावरील तपासणी वाढवल्यामुळे या मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या अर्जदारांच्या व्हिसा मुलाखती 15 डिसेंबरनंतर निश्चित होत्या, त्यांना या नव्या निर्देशांचा मोठा फटका बसला आहे. यापैकी काहींच्या मुलाखती थेट ऑक्टोबर 2026 साठी पुन्हा ठरवण्यात आल्या आहेत.

भारतामधील अमेरिकन दूतावासाने व्हिसा अर्जदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी आधी ठरवलेल्या मुलाखतीच्या तारखेला काउन्सुलर कार्यालयात येऊ नये. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अमेरिकन दूतावासाने स्पष्ट केले आहे की, “जर तुम्हाला ई-मेलद्वारे तुमची व्हिसा मुलाखती पुन्हा शेड्यूल करण्यात आल्याची आणि नवीन तारीख देण्यात आल्याची माहिती मिळाली असेल, तरीही तुम्ही जुन्या वेळापत्रकानुसार मुलाखतीसाठी आलात, तर तुम्हाला दूतावासात प्रवेश दिला जाणार नाही.”

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियम अधिक कठोर केल्यामुळे संपूर्ण व्हिसा प्रक्रियेला अधिक वेळ लागत आहे. याचा सर्वाधिक फटका त्यांना बसत आहे, जे मुलाखतीसाठी भारतात आले आहेत. नवीन व्हिसा मंजूर होईपर्यंत हे लोक अमेरिकेत आपल्या नोकरीवर परत जाऊ शकणार नाहीत.

एच-1बी व्हिसा श्रेणीसोबतच इतर अनेक व्हिसा श्रेणींचे अर्जही रखडले आहेत. अमेरिकेतील स्थलांतर विषयक वकिलांनी एच-1बी व्हिसा अपॉइंटमेंट्स मोठ्या प्रमाणावर रद्द करण्याच्या अमेरिकन सरकारच्या निर्णयावर टीका केली असून, यामुळे अमेरिकेतील कंपन्या आणि नियोक्त्यांसमोर अधिक अडचणी निर्माण होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande