महाडमध्ये तटकरेंना गोगावलेंचा जोरदार धक्का; शिवसेनेची सत्ता
रायगड, 21 डिसेंबर (हिं.स.)। महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे सुनील कविस्कर यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने हा विजय मिळवून राष्ट्रवा
सुनील तटकरे भरत गोगावले


रायगड, 21 डिसेंबर (हिं.स.)। महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे सुनील कविस्कर यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने हा विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती.

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. महाडमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न अपयशी ठरला असून स्नेहल जगताप यांच्यासाठीही हा निकाल मोठा धक्का समजला जात आहे.

नगर परिषदेतील सत्तासमीकरण पाहता राष्ट्रवादीकडे १५ नगरसेवक असूनही अपेक्षित यश मिळवता आले नाही. भाजपकडे दोन तर शिंदे गटाकडे तीन नगरसेवक असताना शिवसेनेने योग्य राजकीय खेळी करत नगराध्यक्षपदावर आपला झेंडा फडकावला आहे.

दुसरीकडे, श्रीवर्धनमध्येही तटकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. येथे उबाठा गटाचे अतुल चोगुले यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अवघ्या ८६ मतांनी विजय मिळवला.

या विजयामुळे महाड शहराच्या राजकारणात शिवसेना (शिंदे गटा) चे बळ वाढले असून मंत्री भरत गोगावले यांचे नेतृत्व पुन्हा एकदा निर्णायक ठरले आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांची एकजूट याचा परिणाम या निकालात स्पष्टपणे दिसून आला.

महाड नगर परिषदेत शिवसेना (शिंदे गटा) चा नगराध्यक्ष झाल्याने आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. हा विजय म्हणजे केवळ नगराध्यक्षपदाचा नसून महाडमधील राजकीय वर्चस्वाची लढाई जिंकणारा ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande