इंडोनेशियात भीषण रस्ता अपघात; १६ जणांचा मृत्यू
जकार्ता, 22 डिसेंबर (हिं.स.)।इंडोनेशियामध्ये एका भीषण रस्ते अपघात घडला आहे. हा अपघात स्थानिक वेळेनुसार रविवारी मध्यरात्रीनंतर झाला. ३४ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस काँक्रीटच्या बॅरियरवर आदळली, त्यामुळे हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत किमान १६ जणां
इंडोनेशियात भीषण रस्ता अपघात, १६ जणांचा मृत्यू


जकार्ता, 22 डिसेंबर (हिं.स.)।इंडोनेशियामध्ये एका भीषण रस्ते अपघात घडला आहे. हा अपघात स्थानिक वेळेनुसार रविवारी मध्यरात्रीनंतर झाला. ३४ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस काँक्रीटच्या बॅरियरवर आदळली, त्यामुळे हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

नॅशनल सर्च अँड रेस्क्यू एजन्सीचे प्रमुख बुडियोनो यांनी सांगितले की, बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस काँक्रीटच्या बॅरियरवर आदळून उलटली. पोलिसांच्या माहितीनुसार, ही बस राजधानी जकार्ता येथून प्राचीन शाही शहर योग्यकार्ताकडे जात होती. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुडियोनो म्हणाले, “तीव्र धडकेमुळे अनेक प्रवासी बसच्या बाहेर फेकले गेले, तर काहीजण बसच्या ढिगाऱ्यात अडकले.”

अपघातानंतर सुमारे ४० मिनिटांनी पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे सहा प्रवाशांचे मृतदेह सापडले. बुडियोनो यांनी पुढे सांगितले की, आणखी १० जणांना रुग्णालयात नेत असताना किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात एकूण १८ जण जखमी झाले असून, त्यापैकी पाच जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे, तर उर्वरित १३ जण गंभीर जखमी आहेत. माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या दृश्यांमध्ये पिवळ्या रंगाची बस एका बाजूला उलटलेली दिसत होती. त्या ठिकाणी नॅशनल सर्च अँड रेस्क्यू एजन्सीचे कर्मचारी, पोलीस आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते, तर रुग्णवाहिका जखमी आणि मृतांना रुग्णालयात घेऊन जात होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande