
मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। 'भाभीजी घर पर है' या लोकप्रिय मालिकेत ओरिजनल अंगुरी भाभी म्हणजे अभिनेत्री शिल्पा शिंदे परत आली आहे. १० वर्षांनंतर तिने पुन्हा मालिकेत एन्ट्री घेतली आहे. यामुळे चाहते खूप खूश झाले आहेत. तिला पुन्हा अंगुरी भाभीच्या भूमिकेत पाहण्यासाठी, तिची बोलण्याची स्टाईल यासाठी चाहते उत्सुक आहेत. आपल्या कमबॅकवर स्वत: शिल्पाही भावुक झाली आहे. नुकतीच तिने यावर प्रतिक्रिया दिली.
आजपासून 'भाभीजी घर पर है २.०' सुरु होत आहे. नव्या आणि मजेशीर गोष्टीसह प्रेक्षकांना जुनी अंगुरी भाभी पाहायला मिळणार आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना शिल्पा शिंदे म्हणाली, १० वर्षच काय २० वर्षही लागू शकत होते कारण मी परत येईन याचा विचारच केला नव्हता.
प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल ती म्हणाली,मी हे कमावलं आहे. मी सत्याचा रस्ता अवलंबला जो खूप कठीण असतो. पण मला हे माहित होतं की मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे माझ्यासोबत काहीही चुकीचं होणार नाही. प्रेक्षक मला पाहून ज्याप्रकारे खूश झाले आहेत तर मी सांगू इच्छिते की मी प्रेक्षकांसाठीच परत आले आहे.ती पुढे म्हणाली, मी प्रेक्षकांना हसवायला आले आहे. त्यांच्या ज्या आशा आकांक्षा संपल्या होत्या त्या पुन्हा जाग्या करायला आले आहे. जेव्हा माझी इच्छा होती तेव्हा मला कोणीच करु दिलं नाही. पण मी सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने घेतल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode