अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा अपघात; सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत नाही
मुंबई, 21 डिसेंबर (हिं.स.)।अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीचा शनिवारी सायंकाळी मुंबईत एका रस्ते अपघात झाला. ती डेव्हिड गुएटा यांच्या शोसाठी सनबर्न फेस्टिव्हलकडे जात असताना कथितरित्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका चालकाने नोराच्या कारला धडक दिली.
अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा अपघात


मुंबई, 21 डिसेंबर (हिं.स.)।अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीचा शनिवारी सायंकाळी मुंबईत एका रस्ते अपघात झाला. ती डेव्हिड गुएटा यांच्या शोसाठी सनबर्न फेस्टिव्हलकडे जात असताना कथितरित्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका चालकाने नोराच्या कारला धडक दिली.अपघातानंतर नोरा यांच्या टीमने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी सांगितले की नोरा फतेही यांना सौम्य धक्का बसला असून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मद्यधुंद चालकाने आपल्या कारने नोरा फतेहीच्या वाहनाला धडक दिली होती. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. प्राथमिक उपचारांसाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मद्यधुंद चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे आणि नशेत गाडी चालवणे यासंबंधी कलमांखाली आरोप लावण्यात आले आहेत.

अपघातानंतर काही तासांनी नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, “मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीने माझ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात माझं डोकं गाडीच्या खिडकीला लागलं. मी जिवंत आहे आणि ठीक आहे. काही किरकोळ जखमा, सूज आणि डोक्याला हलकी दुखापत झाली आहे, पण मी ठिक आहे. यासाठी मी आभारी आहे. हे आणखी गंभीर होऊ शकले असते. मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की दारू पिऊन गाडी चालवू नये. खरं सांगायचं तर मला दारूची चीड आहे.”

याशिवाय तिने सांगितले की ती नेहमीच दारूच्या विरोधात राहिली आहे. तिने कधीही दारू घेतलेली नाही, तसेच ड्रग्स किंवा गांजाचाही वापर केलेला नाही. दारू पिऊन गाडी चालवल्याने लोकांचे जीव धोक्यात येतात, असेही तिने नमूद केले. नोरा पुढे म्हणाली, “हे सगळं सांगितल्यानंतर मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की मी ठीक आहे. काही काळ वेदना राहतील. देवाचे आभार मानते की मी जिवंत आहे. मी खोटं बोलणार नाही, तो क्षण खूप भीतीदायक आणि वेदनादायक होता. मी अजूनही थोड्या धक्क्यात आहे.”

अपघात झाला असतानाही नोरा यांनी आपले वचन पाळले आणि सनबर्न 2025 च्या मंचावर डेव्हिड गुएटा यांच्यासोबत परफॉर्म केले. मात्र, या घटनेनंतर इतक्या लवकर मंचावर परफॉर्म करण्याच्या त्यांच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.यावर प्रतिक्रिया देताना नोरा म्हणाल्या की त्या कोणत्याही गोष्टीला आपल्या कामाच्या आड येऊ देत नाहीत. तसेच, ज्यासाठी त्यांनी इतकी मेहनत घेतली होती, तो क्षण कोणताही मद्यधुंद चालक त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, परंपरेने गोव्यात होणारा सनबर्न फेस्टिव्हल यंदा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसांचा हा कार्यक्रम 19 आणि 20 डिसेंबर रोजी झाला असून 21 डिसेंबरला त्याचा समारोप होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande