बांग्लादेशने अल्पसंख्याकांचे संरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करावी - अमेरिकन खासदार
वॉशिंग्टन, 23 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये एका हिंदू युवकाच्या कथित मॉब लिंचिंगच्या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. अमेरिकेतील खासदारांनी या घटनेचा तीव्र निषेध करत बांगलादेश सरकारकडे धार्मिक अल्पसंख्याकांची सुरक्षितता सुनिश्चित क
बांग्लादेशने अल्पसंख्याकांचे संरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करावी - अमेरिकन खासदार


वॉशिंग्टन, 23 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये एका हिंदू युवकाच्या कथित मॉब लिंचिंगच्या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. अमेरिकेतील खासदारांनी या घटनेचा तीव्र निषेध करत बांगलादेश सरकारकडे धार्मिक अल्पसंख्याकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची आणि कायद्याचे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे.

इलिनॉय येथील डेमोक्रॅट खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी हिंदू युवक दीपु चंद्र दास यांच्या हत्येला लक्ष्यित हिंसा ठरवत म्हटले की, ही घटना देशात वाढत चाललेल्या अस्थिरता आणि अशांततेचे उदाहरण आहे. दोषींविरोधात पारदर्शक चौकशी करून कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या निवेदनात कृष्णमूर्ती म्हणाले “बांगलादेशमध्ये दीपु चंद्र दास यांच्या मॉब लिंचिंगच्या घटनेने मी अत्यंत व्यथित आहे. सरकारने केवळ दोषींना शिक्षा देणेच नव्हे, तर हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांना भविष्यातील हिंसाचारापासून वाचवण्यासाठी तातडीची पावले उचलली पाहिजेत.”

दरम्यान, न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीच्या सदस्या जेनिफर राजकुमार यांनीही ही घटना अत्यंत भयावह असल्याचे सांगत, बांगलादेशमध्ये धार्मिक छळाच्या एका चिंताजनक पद्धतीकडे ती इशारा करते असे म्हटले. त्यांच्या मते, या घटनेत जमावाने युवकावर अमानुष हल्ला केला आणि नंतर त्याच्याशी अत्यंत क्रूर वर्तन करण्यात आले.

राजकुमार यांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषदेच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत अल्पसंख्याकांवर २,४०० पेक्षा जास्त हल्ले झाले असून, १५० हून अधिक मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, ही घटना १९ डिसेंबर रोजी घडली होती, जेव्हा मयमनसिंह शहरातील एका कारखान्यात काम करणाऱ्या दीपु चंद्र दास यांना कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली जमावाने ठार केले. या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकन खासदारांनी स्पष्टपणे म्हटले आहे की धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे संरक्षण ही केवळ बांगलादेशचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची सामूहिक जबाबदारी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande