ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्यात बंदुकींचे कायदे केले कडक
कॅनबेरा , 23 डिसेंबर (हिं.स.)।बॉन्डी बीचवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्स राज्यात कडक बंदूक कायदे मंजूर करण्याची तयारी सुरू आहे. हे कायदे दहशतवादी प्रतीकांचे प्रदर्शन रोखण्यासाठी आणि आंदोलनांवर निय
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्यात बंदुकींचे कायदे केले कडक


कॅनबेरा , 23 डिसेंबर (हिं.स.)।बॉन्डी बीचवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्स राज्यात कडक बंदूक कायदे मंजूर करण्याची तयारी सुरू आहे. हे कायदे दहशतवादी प्रतीकांचे प्रदर्शन रोखण्यासाठी आणि आंदोलनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येणार आहेत. बॉन्डीतील सामूहिक गोळीबाराच्या घटनेनंतर राज्य संसदच्या खालच्या सभागृहाने सोमवारी रात्री उशिरा घेतलेल्या आपत्कालीन अधिवेशनात एक विधेयक मंजूर केले आहे.

‘दहशतवाद आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला’ न्यू साउथ वेल्समधील विरोधी लिबरल पार्टीचा पाठिंबा मिळाला आहे. हे विधेयक मंगळवारी राज्य संसदच्या वरच्या सभागृहातही मंजूर होण्याची अपेक्षा आहे. सत्ताधारी केंद्र-डाव्या विचारसरणीच्या लेबर सरकारने वैयक्तिक बंदूक परवान्यांअंतर्गत ठेवता येणाऱ्या शस्त्रांची संख्या मर्यादित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार, बहुतेक नागरिकांना जास्तीत जास्त चार आग्नेयास्त्रे ठेवण्याचीच परवानगी असेल, तर शेतकऱ्यांना काही सवलत देत दहा बंदुकांपर्यंत परवानगी देण्यात येणार आहे.लेबर सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार, सामान्य नागरिकांसाठी गन लायसन्सअंतर्गत कमाल चारच बंदुका ठेवता येतील. मात्र, शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ही मर्यादा दहा बंदुकांपर्यंत वाढवण्यात आली आहे. १४ डिसेंबर रोजी बॉन्डी येथे यहुदी समुदायाच्या हनुक्का उत्सवाच्या दरम्यान झालेल्या सामूहिक गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाला, तर डझनभर लोक जखमी झाले. या धक्कादायक हल्ल्यानंतर कडक बंदूक कायदे लागू करण्याची आणि यहुदीविरोधी मानसिकतेविरोधात ठोस कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande