
बीड, 25 डिसेंबर (हिं.स.)। ३९ वी किशोर-किशोरी राज्य - अजिंक्यपद व निवड खो-खो स्पर्धा मुंबईत होणार आहे. - ही स्पर्धा श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, मुंबई खो-खो संघटना आणि लायन्स क्लब ऑफ दादर - ज्वेल्स यांच्या सहकार्याने ही स्पर्धा भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे - होणार आहे. या स्पर्धेसाठी बीड - जिल्ह्याचा किशोर-किशोरी संघ निवडण्यात आला आहे. हा संघ - मुंबईकडे रवाना झाला.
या संघात वर्षा जगताप, संस्कृती चौधरी, नम्रता घस, अनुजा घस, श्रावणी जागडे, अलमास सय्यद, समृद्धी घस, देवयानी सोले, मोनिका सोले, नंदिनी बोरगे, कार्तिकी येवले, श्रद्धा काकडे, श्रद्धा कारे, ममता अंधारे, गौरी पांचाळ, आदित्य शिंदे, यश मनतारे, समर्थ तांबारे, श्रेयश जाधव, वेदांत गाडे, अविष्कार गजरे, सौरभ खरात, हर्ष चौरे, यशविर कुंड, सार्थक राठोड, वरद धायगुडे, यश बनसोडे, अनुज घाडगे, सोहम धस, रुद्र धस या खेळाडूंचा सहभाग आहे.
संघाचे प्रशिक्षक अंकुश गायकवाड आणि भरत यादव आहेत. व्यवस्थापक म्हणून सुचिता कुलकर्णी आणि नवनाथ चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. बीडचा हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis