लैंगिक अत्याचाराशी संबंधित यश दयालचा जामीन अर्ज पॉस्को न्यायालयाने फेटाळला
जयपूर, 25 डिसेंबर (हिं.स.)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार वेगवान गोलंदाज यश दयालचा बलात्काराच्या आरोपातील अटकपूर्व जामीन अर्ज जयपूरच्या पोक्सो न्यायालयाने फेटाळला आहे. जयपूर महानगर न्यायालयाच्या न्यायाधीश अलका बन्सल यांनी सांगितले की, उपलब्ध पुरावे
यश दयाल


जयपूर, 25 डिसेंबर (हिं.स.)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार वेगवान गोलंदाज यश दयालचा बलात्काराच्या आरोपातील अटकपूर्व जामीन अर्ज जयपूरच्या पोक्सो न्यायालयाने फेटाळला आहे. जयपूर महानगर न्यायालयाच्या न्यायाधीश अलका बन्सल यांनी सांगितले की, उपलब्ध पुरावे असे सूचित करत नाहीत की, यश दयालला खोटे आरोप लावण्यात आले आहेत. चालू तपासात वेगवान गोलंदाजाचा सहभाग असल्याचे दिसून येते. त्यामुळे या टप्प्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करता येत नाही.

जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये अल्पवयीन तक्रारदाराने आरोप केला आहे की, दयालने तिला तिच्या क्रिकेट कारकिर्दीला पुढे नेण्याचे आश्वासन देऊन आमिष दाखवले, तिला ब्लॅकमेल केले आणि जयपूर आणि कानपूरमधील हॉटेल्ससह अडीच वर्षांच्या कालावधीत तिच्यावर हल्ला केला. पोलीस मुलीच्या मोबाईल फोनवरील चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ तसेच कॉल रेकॉर्ड आणि हॉटेलमधील वास्तव्याचे तपशील हे पोक्सो कायद्यांतर्गत महत्त्वाचे पुरावे म्हणून विचारात घेत आहेत.

दयालने त्याच्या याचिकेत म्हटले आहे की, त्याच्यावरील आरोप खोटे आहेत. दयालने स्वतःला क्रिकेटसाठी समर्पित एक आदरणीय व्यक्ती म्हणून वर्णन केले आणि दावा केला की, महिलांच्या गटाकडून त्याला अडकवले जात आहे. दयालने न्यायालयाला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि त्याच्या याचिकेवर विचार करण्याची विनंती केली.

पीडितेचे प्रतिनिधित्व करताना सरकारी वकील रचना मान म्हणाल्या की, आरोपीने अल्पवयीन मुलीशी तिच्या क्रिकेट कारकिर्दीला पुढे नेण्याचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले. मान यांनी यावर भर दिला की कायद्यानुसार, अल्पवयीन व्यक्तीने दिलेल्या कोणत्याही संमतीला कायदेशीर वैधता नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande