गुजरातच्या कच्छमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप
अहमदाबाद, 26 डिसेंबर (हिं.स.) । गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज, शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनसीएस) आकडेवारीनुसार, भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 4.4 मोजली गेली. रिपोर्टनुसार, भूकंप शुक्रवार सकाळी 4 वा
भूकंप लोगो


अहमदाबाद, 26 डिसेंबर (हिं.स.) । गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज, शुक्रवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनसीएस) आकडेवारीनुसार, भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 4.4 मोजली गेली. रिपोर्टनुसार, भूकंप शुक्रवार सकाळी 4 वाजून 30 मिनीटांनी जाणवला. भूकंपाचे केंद्र कच्छ जिल्ह्यात 23.65 एन अक्षांश आणि 70. 23 पूर्व देशांतरावर स्थित होते. तसेच भूकंपाचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोल असल्याची नोंद आहे.

यासंदर्भातील प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारचा जिवित किंवा वित्तीय हानी अथवा मालमत्तेची हानी होण्याची माहिती नाही. तथापि, सकाळच्या वेळी आलेल्या या धक्क्यांमुळे क्षेत्रातील काही भागांमध्ये लोकांमध्ये घबराट पसरली आणि अनेक रहिवासी सतर्कतेच्या दृष्टीने त्यांच्या घरांमधून बाहेर पडले. कच्छ जिल्हा 'अत्यंत उच्च धोका' असलेल्या भूकंपीय क्षेत्रात येतो, जिथे अनेक वेळा सौम्य तीव्रतेचे भूकंप नोंदवले जातात. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन चमू स्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande