
जळगाव, 27 डिसेंबर (हिं.स.) गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. अशातच आज चांदीने भाव वाढीचे सर्व विक्रम मोडित काढत ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. आज चांदीच्या भावात तब्बल २० हजार रुपयांची वाढ झाली आहे. या भाव वाढीनंतर चांदी जीएसटीसह प्रति किलो २ लाख ५७ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे. तर सोन्याच्या भावातही १ हजार ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने जीएसटीसह १ लाख ४३ हजार ३४७ रुपयांवर पोहोचलं आहे. येणाऱ्या नवीन वर्षात सोनं दीड लाखाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता जळगावच्या सराफा व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर