
जळगाव, 24 डिसेंबर (हिं.स.) | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून ते स्थानिक बाजारपेठेपर्यंत, सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहे. दरम्यान, या आठवड्यातील सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी वाढले असून यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला फटका बसला आहे.
सोमवार, मंगळवारीपाठोपाठ बुधवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,३८,९३० रुपये झाले आहेत. तर ८ ग्रॅमचे दर ३०४ रुपयांनी वाढले असून १,११,१४४ रुपये झाले आहेत.आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३५० रुपयांनी महागले आहेत. हे दर १,२७,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २८० रुपयांनी वाढले आहेत हे दर १,०१,८८० रुपये झाले आहेत.जळगाव सराफ बाजारात सोमवारपाठोपाठ मंगळवारी सोने तोळ्यामागे २२६६ रुपयांनी वाढून १,४०,२८६ रुपये तोळ्यावर पोहोचले. तर चांदी ६४८९ रुपयांनी वाढल्याने प्रतिकिलो २,२१,७५९ रु. वर पोहोचली. हा सोन्यासह चांदीचा सर्वकालीन उच्चांकी दर ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर