फ्लॅशबॅक 2025 : भारतीय हॉकीसाठी चढ-उतारांचे वर्ष
मुंबई, 27 डिसेंबर (हिं.स.)२०२५ मध्ये भारताच्या हॉकी पुनरुज्जीवनाला काही अडथळ्यांचा सामना करावा लागल्याने संघाच्या कामगिरीत चढ-उतार दिसून आले. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे महिला संघाची घसरण, जरी पुरुष संघाने जवळपास एका दशकानंतर पहिले आशिया कप विजेतेपद
भारतीय हॉकीसाठी चढ-उतारांचे वर्ष


भारतीय हॉकीसाठी चढ-उतारांचे वर्ष


भारतीय हॉकीसाठी चढ-उतारांचे वर्ष


मुंबई, 27 डिसेंबर (हिं.स.)२०२५ मध्ये भारताच्या हॉकी पुनरुज्जीवनाला काही अडथळ्यांचा सामना करावा लागल्याने संघाच्या कामगिरीत चढ-उतार दिसून आले. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे महिला संघाची घसरण, जरी पुरुष संघाने जवळपास एका दशकानंतर पहिले आशिया कप विजेतेपद पटकावून परिस्थिती सुधारली असली तरी.

बिहारमधील राजगीर येथे मिळालेले आशिया कप विजेतेपद हा कदाचित २०२५ मधील भारतीय हॉकीसाठी सर्वात मोठा क्षण होता. कारण यामुळे केवळ आठ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळच संपला नाही. तर पुढील वर्षी १४ ते ३० ऑगस्ट दरम्यान नेदरलँड्स आणि बेल्जियम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या एफआयएच विश्वचषकातील भारतीय संघाचे स्थानही निश्चित झाले.

सप्टेंबरमधील या विजयामुळे भारताचे हे एकूण चौथे विजेतेपद होते. भारताला आपले खंडीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करता आले. या स्पर्धेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये १५ गोल करणे आणि केवळ दोन गोल स्वीकारणे ही सर्वात मोठी सकारात्मक बाब होती. अंतिम सामन्यात भारतीय संघाने गतविजेत्या दक्षिण कोरियावर ४-१ असा विजय मिळवला. ज्यात दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग आणि अमित रोहिदास यांच्यासह इतर हॉकीपटूंनी आपली छाप सोडली.

यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला एफआयएच प्रो लीगमध्ये संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता संघ नऊ संघांपैकी आठव्या स्थानावर राहिला होता. आणि त्यांनी या प्रतिष्ठित स्पर्धेतून बाहेर पडणे कसेबसे टाळले होते.

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने घरच्या मैदानावर भुवनेश्वरमध्ये पाच विजय मिळवून चांगली कामगिरी केली. पण युरोपियन टप्प्यात सलग सात पराभवांचा सामना करावा लागल्याने भारतीय संधाला शेवटच्या स्थानाच्या आधीच्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पुरुष संघासाठी आणखी एक उत्साहवर्धक बाब म्हणजे दुसऱ्या फळीच्या संघाने सुलतान अझलन शाह चषकात रौप्य पदक पटकावण्याची किमया साधली. सहा वर्षांनंतर या स्पर्धेत परतलेल्या पाच वेळच्या विजेत्या भारताला अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमकडून ०-१ असा पराभव सहन करावा लागला होता. पण हरमनप्रीत सिंग आणि मनप्रीत सिंग यांसारख्या वरिष्ठ हॉकीपटूंनी योग्य विश्रांती घेतली असताना, बचावपटू संजयच्या नेतृत्वाखालील नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी आश्वासक झाली होती.

कनिष्ठ पुरुष संघानेही धैर्याने केलेल्या कामगिरीने प्रभावित केले होते. दोन गोलची पिछाडी भरून काढत अर्जेंटिनाला ४-२ ने पपाभूत करत या महिन्यात चेन्नईत झालेल्या विश्वचषकात कांस्यपदक जिंकले. २०१६ नंतर या वयोगटातील स्पर्धेत मिळालेल्या पहिल्या विश्वचषक पदकामुळे केवळ वर्षाचा सकारात्मक शेवटच झाला नाही. तर पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भविष्यासाठी आशाही निर्माण झाली आहे. जपानमधील सुवर्णपदक २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी तिकीट निश्चित करणार आहे. जिथे भारताने निश्चितच पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची आशा बाळगली आहे. आणि शक्यतोवर गेल्या दोन स्पर्धांमध्ये जिंकलेल्या कांस्यपदकापेक्षा संघ निश्चितच आपल्या पदका रंग बदलण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.

याउलट महिला संघ ह़ॉकीच्या मैदानावर वर्षभर संघर्ष करताना पाहिला मिळाला. संघ या वर्षी कोणतेही संस्मरणीय यश मिळवण्यात अपयशी ठरला. आणि गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरल्यापासून सुरू झालेली घसरण यंदाही कायम राहिली.

प्रो लीगमध्ये संघाने शेवटचे स्थान पटकावले होते. केवळ दोन सामने जिंकले आणि सलग आठ सामन्यांसह एकूण ११ सामने गमावले. ज्यामुळे त्यांची दुसऱ्या श्रेणीतील स्पर्धा असलेल्या एफआयएच नेशन्स कपमध्ये पदावनती झाली. या स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यासच संघाला २०२६-२७ च्या एफआयएच प्रो लीगमध्ये बढती मिळाली असती..

महिला संघाच्या अडचणींमध्ये आणखी भर म्हणून पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी संघ थेट स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. कारण सप्टेंबरमध्ये आशिया कपमध्ये चीनकडून १-४ ने पराभव स्वीकारुन त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

वर्षाच्या अखेरीस संघाला मोठ्या उलथापालथीचा सामना करावा लागला होता. जेव्हा मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना कालबाह्य प्रशिक्षण शैली आणि हुकूमशाहीच्या आरोपांनंतर राजीनामा द्यावा लागला. पण राष्ट्रीय महासंघाने दावा केला की, याचा संबंध अधिक प्रमाणात निकालांच्या अभावाशी होता.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहून खूप काही करण्याची क्षमता दाखवणाऱ्या भारतीय महिला संघाने आता दिशाहीन संघाचे स्वरूप धारण केले आहे. डिसेंबरमध्ये अनुभवी हॉकीपटू वंदना कटारियानेही आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली, ज्यामुळे तिच्या शानदार कारकिर्दीचा शेवट झाला आणि संघाला आधीच जाणवत असलेल्या प्रतिभेच्या कमतरतेत आणखी भर पडली.

या घसरणीतून ज्युनियर संघही सुटला नाही, कारण या महिन्याच्या सुरुवातीला सँटियागो येथे झालेल्या विश्वचषकात संघ १०व्या स्थानावर राहिला. सध्याची सपरिस्थिती पाहता राष्ट्रीय महासंघ आणि संघ व्यवस्थापनाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

ज्युनियर संघही चौकशीच्या फेऱ्यात सापडला होता. कारण प्रशिक्षण कर्मचाऱ्यांपैकी एका सदस्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाले. ज्याला अखेरीस राष्ट्रीय महासंघाने निर्दोष घोषित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande