प्रजासत्ताकदिन पथसंचलनासाठी मराठवाडा विद्यापीठाच्या अक्षता मुळेची निवड
छत्रपती संभाजीनगर, 28 डिसेंबर (हिं.स.)। नवी दिल्ली येथे २६ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली होणा-या प्रजासत्ताकदिन पथसंचलनासाठी (नॅशनल परेड) डॉ़ बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाच्या अक्षता अच्युत मुळे या रासेयो स्वयंसेविकेची निवड करण्यात आली
नवी दिल्ली होणा-या प्रजासत्ताकदिन पथसंचलनासाठी डॉ़ बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाच्या अक्षता मुळे हिची निवड करण्यात आली. मा कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.


छत्रपती संभाजीनगर, 28 डिसेंबर (हिं.स.)।

नवी दिल्ली येथे २६ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली होणा-या प्रजासत्ताकदिन पथसंचलनासाठी (नॅशनल परेड) डॉ़ बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाच्या अक्षता अच्युत मुळे या रासेयो स्वयंसेविकेची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संचालक डॉ. सोमनाथ खाडे यांनी दिली. मागील पाच वर्षाची प्रतिक्षा संपली या निमित्ताने संपली आहे.

या पथसंचलनामध्ये विद्यापीठातून अक्षता अच्युत मुळे या विद्यार्थीनीची निवड झाली आहे. ३१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या दरम्यान हेमचंद्रचार्या नॉर्थ गुजरात विद्यापीठ, पाटन गुजरात येथे आयोजित पश्चिम विभागीय स्थरावरील निवड चाचणी करीता विद्यापीठ अंतर्गत असलेल्या चार जिल्ह्यांतून निवड चाचणासाठी आठ जणांचा संघ सहभागी झाला. या निवड चाचणीमध्ये १५ दिवसाच्या प्रशिक्षणातून महाराष्ट्रातील १२ स्वयंसेवकांची निवड झाली. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागातून अंबाजोगाई येथील अक्षता अच्युत मुळे या विद्यार्थिनींची निवड दिल्ली येथे होणा-या पथसंचलनासाठी करण्यात आली. या निवडीबद्दल मा़ कुलगुरू डॉ़ विजय फुलारी यांच्या हस्ते अक्षता मुळे हीचा सत्कार करण्यात आला़. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोमीनाथ खाडे, प्राचार्य डॉ. एम व्ही कानेटकर यांनी शुभेच्छा दिल्या. विभागातील अनिल मालकर, श्याम बन्सवाल, सुनिल पैठणे यांनी अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande