परभणी : यंत्रणांनी रोखला बालविवाह
परभणी, 28 डिसेंबर (हिं.स.)। महिला बालविकास विभाग, पोलिस विभाग, महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाईत परभणी शहरात होणारा एक बालविवाह रोखला. महिला व बाल विभागा अंतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्पलाइन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर याबाबतची गोपनीय माहिती मिळाल
परभणी : यंत्रणांनी रोखला बालविवाह


परभणी, 28 डिसेंबर (हिं.स.)।

महिला बालविकास विभाग, पोलिस विभाग, महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाईत परभणी शहरात होणारा एक बालविवाह रोखला. महिला व बाल विभागा अंतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्पलाइन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने होणाऱ्या बालविवाहाची माहिती बालकल्याण समिती परभणी, बाल विकास प्रकल्प शहरी परभणी, महापालिका प्रशासन, नानलपेठ पोलिस ठाणे, कोतवाली पोलिस ठाणे यांना तत्काळ देण्यात आली. सर्व यंत्रणांनी एकत्र येत हा बालविवाह थांबवला आहे. बालिकेचा काळजी व संरक्षणकरीता बालिकेस बाल कल्याण समिती परभणी यांच्यासमक्ष हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनात बालविवाह थांबण्याची प्रक्रिया पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande