भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्यासाठी प्रधान सचिव हर्षदीप कांबळेंकडून आढावा
पुणे, 28 डिसेंबर (हिं.स.)।भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विभागांनी घेत उत्सव आनंदात पार पाडावा अशी सुचना सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज प्रशास
भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्यासाठी प्रधान सचिव हर्षदीप कांबळेंकडून आढावा


पुणे, 28 डिसेंबर (हिं.स.)।भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विभागांनी घेत उत्सव आनंदात पार पाडावा अशी सुचना सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज प्रशासकीय समितीच्या बैठकीत केली.

यावेळी समाजकल्याण आयुक्त दिपा मुंडे , बार्टी महासंचालक सुनिल वारे , पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल , पोलिस उपायुक्त सोमय मुंडे , जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे चंद्रकांत वाघमारे व भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे राहुल डंबाळे यांचेसह विविध विभागातील प्रतिनिधी सहभागी होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande