बीड भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
बीड, 28 डिसेंबर (हिं.स.)। आज बीड शहरातील हॉटेल यशराज इन येथे बीड तालुका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, जिल्हाध्य
भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती


बीड, 28 डिसेंबर (हिं.स.)।

आज बीड शहरातील हॉटेल यशराज इन येथे बीड तालुका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, सर्जेराव तांदळे, निरीक्षक माधव निर्मळ, सतिश मुंडे, संजय आंधळे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बीड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असून इच्छुकांची असणारी भाऊ गर्दी येणारा आपला विजय खुणावत आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी ताकदीने कामाला लागावे असे आवाहन केले.

यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande