
पुणे, 28 डिसेंबर (हिं.स.)पुणे शहरासह महाराष्ट्रातील विविध भागांत पाकिस्तानमधील शहरांच्या नावाने, विशेषतः ‘कराची’ या नावाखाली सुरू असलेल्या हॉटेल्स, मिठाई दुकाने व अन्य व्यावसायिक आस्थापनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख तथा सर्वोदय ग््रुापचे अध्यक्ष ओंकार तुपे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाकिस्तानी शहरांची नावे वापरणाऱ्या आस्थापनांची वाढती संख्या ही देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावणारी व असंवेदनशील असल्याचे नमूद केले आहे. पाकिस्तानने अनेक वर्षे भारतविरोधी कारवाया व दहशतवादाला पाठिंबा दिला असून, यामध्ये असंख्य निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून भारतीय जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. अशा देशातील शहरांची नावे व्यवसायासाठी वापरणे हे शहीद जवानांच्या त्यागाचा अपमान असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु