पुणे - ‘मविआ’ची तिन्ही पक्षांना प्रत्येकी ५० जागा
पुणे, 28 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमवेत महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याची चर्चा संपुष्टात आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांची जागावाटपासंबंधी बैठक झाली. या बैठकीमध्ये प्राथमिक स्तरावर काँग्रेस, राष्ट्
पुणे - ‘मविआ’ची तिन्ही पक्षांना प्रत्येकी ५० जागा


पुणे, 28 डिसेंबर (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमवेत महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याची चर्चा संपुष्टात आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांची जागावाटपासंबंधी बैठक झाली.

या बैठकीमध्ये प्राथमिक स्तरावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तिन्ही पक्षांना प्रत्येकी ५०, तर महाविकास आघाडीतील समविचारी मित्र पक्षांसाठी १५ जागा देण्याचा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे ठरले होते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ३५ जागा देण्याचे दिलेले आश्‍वासन व ‘घड्याळ’ याच चिन्हावर निवडणूक लढण्याच्या अटी घालण्यात आल्या. या अटी अमान्य करत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रवादीला रामराम ठोकला.

त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीतील कॉंग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी तातडीने संपर्क साधला. आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांची सायंकाळी जागा वाटपाबाबत बैठक सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande