
डोंबिवली, 28 डिसेंबर (हिं.स.)।
कॅरे 1 हॉस्पीटल, आर आर हॉस्पिटल आणि रिचर्स सेंटर यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मोफत हृदय तपासणी व अँजिओग्राफी शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सहा दिवसांच्या आरोग्य शिबिरात एकूण 1120 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले.
या सहा दिवसांच्या आरोग्य शिबिरात एकूण 1120 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 106 रुग्णांवर मोफत अँजिओग्राफी, 250 रुग्णांची 2D इको तपासणी, 45 रुग्णांमध्ये नव्याने मधुमेह निदान झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. तसेच या शिबिरामध्ये 2D इको, ECG व रक्ततपासणी मोफत करण्यात आली. तसेच शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
या शिबिरात हृदयरोगतज्ञांसह जनरल मेडिसिन, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, न्यूरोसर्जरी, स्पाइन सर्जरी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, जनरल सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, डेंटल व फिजिओथेरपी अशा विविध सुपरस्पेशालिटी विभागांचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. याच कालावधीत म्हणजे 25 व 28 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असल्याचे आर आर हॉस्पिटलचे संचालक विकी रमेश पाटील यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi