पुण्यात वंबआ आणि मनसेलाही सामावून घेणार मविआ
पुणे, 28 डिसेंबर (हिं.स.)दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य युती तुटल्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जोडणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या आघाडीत प्रमुख घटक पक्षांसह वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामा
पुण्यात वंबआ आणि मनसेलाही सामावून घेणार मविआ


पुणे, 28 डिसेंबर (हिं.स.)दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य युती तुटल्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जोडणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या आघाडीत प्रमुख घटक पक्षांसह वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामावून घेण्याची तयारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.

दोन्ही राष्ट्रवादींच्या उमेदवारांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा अजित पवार यांचा आग्रह शरद पवार यांनी नाकारल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य युती संपुष्टात आली आहे. त्यानंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

आज पहाटेपर्यंत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढवण्याबद्दल चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडी देखील या आघाडीत सहभागी होण्यास तयार असून त्यांच्याकडून 40 जागांची यादी आमच्याकडे देण्यात आली आहे, असे काकडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या मनसेला देखील सामावून घेण्याची आपली तयारी आहे. मात्र, त्यांना देण्यात येणाऱ्या जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आलेल्या जागांमधून दिल्या जातील, असेही काकडे यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande