
सोलापूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।शहरात सध्या कडाक्याच्या थंडीने नागरिक गारठले आहेत अशा परिस्थितीत रस्त्यावर, झोपडीमध्ये थंडीत कुडकुडणाऱ्या 200 गरजुंना वारी परिवाराने ब्लॅंकेटचे वाटप करून मायेची ऊब दिली. सद्या थंडीचा जोर वाढला असून या थंडीने सर्वसामान्य नागरिक कुडकुडला आहे तर अनेकांनी सध्या शेकोटीचा आधार देखील घेतला आहे.
अशा परिस्थितीत रस्त्यावर उघड्यावर राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना पोटाची उपजीविका करण्यासाठी थंडीत देखील घराबाहेर पडावे लागत आहे वारी परिवाराने मात्र सरत्या वर्षाला निरोप देताना सामाजिक बांधिलकी जोपासली आहे सामाजिक जाणीवेतून रस्त्यालगत, मंदिराशेजारी,निराधार,झोपडपट्टी व गरजुंना ब्लँकेट वाटप करण्यात आले या उपक्रमातून मानवतेचा संदेश देण्यात आला. उपक्रमासाठी राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी सिद्धेश्वर शिंदे,उमेश माने,प्रफुल्ल सोमदळे,दत्तात्रय भोसले,सुनिल लेंडवे,आदेश मोरे,किरण मोरे, विठ्ठल बिले,रतिलाल दत्तू,गणेश मोरे,पार्थ भगरे,प्रा विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड