
पुणे, 28 डिसेंबर (हिं.स.)महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांसह त्या आधीच्या ९ गावांच्या मिळकतकर वसुलीस शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने स्थगिती दिली आहे. मात्र, दुसरीकडे या गावांमधील इच्छुकांना महापालिका निवडणूक लढवायची असल्याने अर्जासोबत द्यावी लागणारे महापालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी या इच्छुकांना पूर्ण मिळकतकर भरावा लागत असल्याने अनेकांना चांगलाच आर्थिक भुर्दंड बसला आहे.
त्यामुळे, महापालिकेने याबाबत विशेष आदेश काढून या वसुलीस स्थगिती देण्याची मागणी केली जात आहे.महापालिकेत ही गावे समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेने ग्रामपंचायतीकडील रेकाॅर्ड घेऊन त्यानुसार कर आकारणी केली. मात्र, त्याच वेळी ही बांधकामे अनधिकृत असल्याने महापालिकेने त्यांना शास्तीकर लावला. त्यामुळे, ग्रामपंचायत आकारत असलेल्या मिळकतराच्या कितीतरी अधिक पटीने या नागरिकांना महापालिकेकडून बीले देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु