
नवी दिल्ली , 29 डिसेंबर (हिं.स.)।दिल्लीमध्ये आज सकाळी दाट धुक्याचे वातावरण असल्याने भारतीय हवामान विभागाने सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता, मात्र नंतर तो बदलून रेड अलर्ट करण्यात आला आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सफदरजंग येथे दृश्यता केवळ 50 मीटर इतकी होती. धुक्यामुळे विमान आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर प्रदूषणाची पातळीही वाढली आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थंडीच्या लाटांमुळे दाट धुके पसरले असून त्यामुळे अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब होत आहे. काही विमानसेवा रद्द होण्याचीही शक्यता आहे. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना त्यांच्या विमानाच्या स्थितीची (फ्लाइट स्टेटस) तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. तर
धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या सुमारे 70 गाड्या 2 ते 15 तास उशिराने धावत आहेत. दिल्लीमध्ये उशिरा पोहोचल्याने परतीच्या मार्गावरील अनेक गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसह अनेक लोकल गाड्याही उशिराने धावत असल्यामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवी दिल्ली–बरौनी हमसफर विशेष – 14.05 तास,नवी दिल्ली–कानपूर श्रमशक्ती एक्सप्रेस – 11.05 तास, नवी दिल्ली–कालका शताब्दी एक्सप्रेस – साडे चार तास, नवी दिल्ली–अमृतसर शान-ए-पंजाब एक्सप्रेस – साडे पाच तास, नवी दिल्ली–सोगरिया (कोटा) सुपरफास्ट एक्सप्रेस – साडे चार तास, नवी दिल्ली–दरभंगा हमसफर विशेष – 5 तास, आनंद विहार टर्मिनल–अयोध्या कॅन्ट वंदे भारत – 6.05 तास, नवी दिल्ली–लखनऊ स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस – 3 तास, नवी दिल्ली–फिरोजपूर इंटरसिटी एक्सप्रेस – 2 तास, आनंद विहार टर्मिनल–जोगबनी सीमांचल एक्सप्रेस – दीड तास उशिरा या गाड्या उशिराने धावणाऱ्या प्रमुख गाड्यांमध्ये आहेत.
दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीबीसी) च्या समीर अॅपनुसार, सकाळी आठ वाजता वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 402 नोंदवला गेला, जो ‘गंभीर’ श्रेणीत मोडतो. आनंद विहार (455) आणि विवेक विहार (456) हे सर्वाधिक प्रदूषित भाग ठरले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode