मध्यप्रदेशच्या कामगारावर तामिळनाडून प्राणघातक हल्ला
अल्पवयीन आरोपींनी केले कृत्य, व्हिडीओही काढला तिरुवल्लूर,29 डिसेंबर (हिं.स.)। तमिळनाडूच्या तिरुवल्लूर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशहून रोजीरोटी कमावण्यासाठी आलेल्या सिराज नावाच्या स्थलांतरित मजुरावर 4 अल्पवयीन मुलांनी निर्घृण हल्ला
हल्ला लोगो


अल्पवयीन आरोपींनी केले कृत्य, व्हिडीओही काढला

तिरुवल्लूर,29 डिसेंबर (हिं.स.)। तमिळनाडूच्या तिरुवल्लूर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशहून रोजीरोटी कमावण्यासाठी आलेल्या सिराज नावाच्या स्थलांतरित मजुरावर 4 अल्पवयीन मुलांनी निर्घृण हल्ला केला. या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी झाला असून तो सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार, सिराज चालत्या ट्रेनमधून प्रवास करत असताना चार अल्पवयीनांनी त्याला घेरले. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे होती. सुरुवातीला त्यांनी त्याला घाबरवले आणि या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार केला. थोड्याच वेळात हा प्रकार हिंसाचारात बदलला.यानंतर सिराजला जबरदस्तीने रेल्वे स्थानकाजवळील एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले, जिथे त्याच्यावर वारंवार हल्ला करण्यात आला. या अमानवी कृत्याचाही व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, हल्ल्यानंतर एका अल्पवयीन आरोपीने व्हिडीओमध्ये विजयाची खूण करतानाही दिसून येतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संताप आणि दुःखाची भावना पसरली. एक मेहनती मजूरावर इतकी क्रूरता का करण्यात आली, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे. सध्या सिराजची प्रकृती अत्यंत गंभीर असून डॉक्टरांच्या मते त्याची अवस्था नाजूक आहे.

दरम्यान, पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेत तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, प्रकरणाच्या सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. ही घटना केवळ कायदा व सुव्यवस्थेवरच नव्हे, तर समाजाच्या संवेदनशीलतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande