चक्रीवादळ दित्वाह: पीडितांच्या मदतीसाठी भारतीय सेनेची एक विशेष तुकडी श्रीलंकेत
नवी दिल्ली , 3 डिसेंबर (हिं.स.)।भारताने पुन्हा एकदा ‘शेजारी प्रथम’ धोरणाची उत्तम उदाहरण सादर केली आहे. श्रीलंकेत चक्रीवादळ दित्वाह मुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, त्या पार्श्वभूमीवर भारताने शेजारी देशाला मदतीचा हात देत ‘ऑपरेशन सागर बंधु’ सुरू
चक्रीवादळ दित्वाह: पीडितांच्या मदतीसाठी भारतीय सेनेची एक विशेष तुकडी श्रीलंकेत


चक्रीवादळ दित्वाह: पीडितांच्या मदतीसाठी भारतीय सेनेची एक विशेष तुकडी श्रीलंकेत


नवी दिल्ली , 3 डिसेंबर (हिं.स.)।भारताने पुन्हा एकदा ‘शेजारी प्रथम’ धोरणाची उत्तम उदाहरण सादर केली आहे. श्रीलंकेत चक्रीवादळ दित्वाह मुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, त्या पार्श्वभूमीवर भारताने शेजारी देशाला मदतीचा हात देत ‘ऑपरेशन सागर बंधु’ सुरू केले आहे. भारतीय सेनेची एक विशेष तुकडी बुधवारी श्रीलंकेत पोहोचली असून ती मानवीय आपत्ती निवारण (एचएडीआर ) मोहिमा,बचाव आणि मदत कार्यात मदत करत आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले की भारत श्रीलंकेच्या पूरनिवारण प्रयत्नांमध्ये सातत्याने सहकार्य करत आहे. भारतीय वायुसेनेचे C-17 विमान, ज्यामध्ये वैद्यकीय पथक आणि उपकरणे होती, कोलंबो येथे उतरण्यात आले आहे.

जयशंकर यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले,“भारतीय वायुसेनेचे C-17 वाहतूक विमान — ज्यामध्ये स्वयंपूर्ण, मॉड्युलर फील्ड हॉस्पिटल, 70 हून अधिक वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचारी व वाहने आहेत — कोलंबोला पोहोचले आहे. भारत श्रीलंकेच्या पूरनिवारण प्रयत्नांना सतत मदत करत आहे.”

यापूर्वी भारतातील श्रीलंकेच्या उच्चायुक्त महिषिनी कोलोन यांनी सुनामी, आर्थिक संकट आणि चक्रीवादळामुळे झालेल्या हानीसह विविध कठीण काळात ही भारताने ‘पहिल्या प्रतिसादकर्त्याची’ भूमिका निभावल्याबद्दल प्रशंसा केली. उच्चायुक्त म्हणाल्या, “चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठे नुकसान झाले आहे. 400 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे. आम्ही अजूनही बचाव आणि मदत कार्यात गुंतलेले आहोत. नुकसानाचे संपूर्ण मूल्यमापन करण्यास वेळ लागेल. भारताने नेहमीप्रमाणे सर्वात आधी मदतीचा हात दिला याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. सुनामीच्या वेळी, त्यानंतर आर्थिक संकटात आणि आता चक्रीवादळाच्या वेळी—भारत सर्वात प्रथम धावून आला. भारतीय पथके जमिनीवर बचाव आणि वैद्यकीय सेवा देत आहेत, मोबाइल रुग्णालये कार्यरत आहेत आणि श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहेत. आम्हाला विश्वास आहे की श्रीलंका आणि भारत एकत्र काम करत राहतील आणि ही आपत्ती दोन्ही देशांना आणखी जवळ आणेल.”

दरम्यान श्रीलंकेकडील अहवालांनुसार, चक्रीवादळ दित्वाहमुळे मृतांची एकूण संख्या 410 वर पोहोचली आहे. स्थानिक माध्यमांनी आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या माहितीनुसार सांगितले की 407,594 कुटुंबांतील तब्बल 1.4 दशलक्ष लोक या आपत्तीने प्रभावित झाले आहेत. संपूर्ण बेटावर पूर, भूस्खलन आणि मुसळधार पावसाचा तडाखा सुरूच आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande