
नांदेड, 30 डिसेंबर (हिं.स.)जालना जिल्ह्यातील भाविकांना घेऊन तिरुपतीचे देवदर्शन करून गावाकडे जाणाऱ्या जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप वाका फाट्यावरील गतिरोधकावर आदळली. या अपघातात दुचाकीवरील पाचजण गंभीर जखमी झाले असून, जखमींवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना घडली.
वाकोळणी (ता. बदनापूर, जि. जालना) येथील जीप (क्र. एमएच १२ इएक्स २७५४) मधून तिरुपतीचे दर्शन घेऊन नांदेडमार्गे जालनाकडे परत जताना नांदेड ते हैदराबाद महामार्गावरील वाका फाट्यावरील गतिरोधकावर जीप आदळली.दरम्यान, नांदेडकडे जाणाऱ्या तीन दुचाकी एमएच २२ के ९३४६, एमएच २६ सी १४६८, एमएच २६ एम ३८१९ या तीन दुचाकींना ठोकर दिली. या अपघातात दुचाकीवरील मुजाहीद गुलाम मुजीर शेख (वय २२), अफजान बालोधीन शेख (वय३०, रा. दोघेही रहेमतनगर, नांदेड), हनुमंत माणिकराव रेवपवार (वय ४५, रा. देगलूर), शंकर भुम्मना बौदलवाड (रा. देगलूर) व अविनाश शेषेराव कांबळे (वय ३५, रा. खरब खंडगाव, ता. मुखेड) यांना गंभीर दुखापत झाली.जखर्मीना नांदेड येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही वेळ या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis