फ्लॅशबॅक 2025: महिला विश्वचषक विजय; मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर पुरुष कसोटी क्रिकेटमध्ये अस्थिरता
मुंबई, 30 डिसेंबर (हिं.स.)भारतीय क्रिकेटसाठी, २०२५ हे वर्ष एखाद्या रोलर-कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हते.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील विजय, आशिया कपमधील यश आणि इंग्लंडच्या भूमीवरची एक शानदार कसोटी मालिका असे काही उच्चांक होते. तर काही विसरण्यासारख्या क
महिला विश्वचषक विजय; मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर पुरुष कसोटी क्रिकेटमध्ये अस्थिरता


महिला विश्वचषक विजय; मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर पुरुष कसोटी क्रिकेटमध्ये अस्थिरता


महिला विश्वचषक विजय; मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर पुरुष कसोटी क्रिकेटमध्ये अस्थिरता


महिला विश्वचषक विजय; मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर पुरुष कसोटी क्रिकेटमध्ये अस्थिरता


महिला विश्वचषक विजय; मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर पुरुष कसोटी क्रिकेटमध्ये अस्थिरता


महिला विश्वचषक विजय; मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर पुरुष कसोटी क्रिकेटमध्ये अस्थिरता


स्मृती मानधना


मुंबई, 30 डिसेंबर (हिं.स.)भारतीय क्रिकेटसाठी, २०२५ हे वर्ष एखाद्या रोलर-कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हते.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील विजय, आशिया कपमधील यश आणि इंग्लंडच्या भूमीवरची एक शानदार कसोटी मालिका असे काही उच्चांक होते. तर काही विसरण्यासारख्या कामगिरीही होत्या. यामध्ये विशेषकरुन मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमावलेली कसोटी मालिका सर्वात निराशाजनक होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यश

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कठीण काळ अनुभवल्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघाने जानेवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमधील वर्चस्वपूर्ण कामगिरीने २०२५ वर्षाची सुरुवात केली. संघाने पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ ने जिंकली आणि एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकून क्लीन स्वीप केला.

भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेत, अभिषेक शर्माने अंतिम सामन्यात वानखेडे स्टेडियमवर १३५ धावा केल्या, जो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेला सर्वोच्च स्कोअर आहे.

भारताने हीच लय जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पाकिस्तान आणि यूएईने संयुक्तपणे आयोजित केलेल्या २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कायम ठेवली. आठ वर्षांच्या अनुपस्थितीनंतर आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये परतलेल्या या एकदिवसीय स्पर्धेत संघाने अभूतपूर्व तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 'मेन इन ब्लू' संघ या स्पर्धेत अपराजित राहिला होता. गट टप्प्यात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या शतकाने संघाला विजय मिळवून दिला. हा एक महत्त्वाचा क्षण होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार रोहित शर्मा हिरो ठरला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पुढील स्पर्धा इंग्लंडविरुद्ध परदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका होती. पण त्याआधीच एक मोठी बातमी आली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही त्या स्पर्धेपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

शुभमन गिल युगाची सुरुवात

शुभमन गिलची नवीन कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघासाठी एका नवीन युगाची सुरुवात झाली आणि तीही अत्यंत नाट्यमय पद्धतीने. अलीकडच्या काळातील सर्वात रोमांचक आंतरराष्ट्रीय कसोटी मालिकांपैकी एक असलेल्या या मालिकेत भारत आणि इंग्लंड मालिका बरोबरीत सोडवण्यात यशस्वी झाले. यजमानांनी लीड्समधील पहिली कसोटी आणि लॉर्ड्सवरील तिसरा सामना जिंकला, तर पाहुण्यांनी एजबॅस्टन येथील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आणि द ओव्हल येथील अंतिम सामन्यात सहा गडी राखून एक नाट्यमय विजय मिळवत मालिका वाचवली.

विशेष म्हणजे, गिलनेच संघाचे नेतृत्व केले. भारतीय कर्णधाराने चार शतके आणि एका द्विशतकासह तब्बल ७५४ धावा केल्या, ज्यात त्याची सरासरी ७५.४० इतकी जबरदस्त होती.

आशिया चषक विजय आणि ऑस्ट्रेलिया दौरा

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही हीच लय कायम ठेवत भारताने सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले.सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणि अभिषेक शर्माच्या सनसनाटी फॉर्मच्या जोरावर, भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून विक्रमी नववे खंडीय विजेतेपद मिळवले. १४६ धावांचा पाठलाग करताना संथ सुरुवातीनंतर भारताला सावरणाऱ्या तिलक वर्माची नाबाद ६९ धावांची खेळी अंतिम सामन्याचा नायक ठरला होता. आशिया चषक जिंक मायदेशी परतल्यानंतर ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळताना, भारताने ती २-० अशी जिंकली. भारताचा पूर्णवेळ लाल चेंडूचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गिलचा हा पहिला मालिका विजय होता.

त्यानंतर लवकरच गिलची भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणूनही नियुक्ती झाली त्याने रोहित शर्माची जागा घेतली. या फॉरमॅटमधील त्याचे पहिले आव्हान तितके यशस्वी ठरले नाही. कारण ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ असा पराभव सहन लागला. सिडनी येथील अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या शतकामुळे भारताचा व्हाईटवॉश टळला होता. त्यानंतरच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली आणि पहिला व शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केले.

घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आव्हानात्मक कसोटी मालिका

नोव्हेंबर महिन्यात भारताच्या क्रिकेट वर्षातील सर्वात निराशाजनक क्षण आला आणि कदाचित एका उदयोन्मुख पॅटर्नची चिंताजनक पुनरावृत्ती झाली. गेल्या हंगामात न्यूझीलंडने घरच्या मैदानावर कसोटी मालिकांमध्ये भारताची १२ वर्षांची अपराजित मालिका खंडित केल्यानंतर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकतर्फी विजयाचा अल्पकाळ मिळालेला दिलासा फार काळ टिकला नाही.

दक्षिण आफ्रिकेने जुन्या जखमा पुन्हा उघडल्या आणि त्या अधिक खोल केल्या, भारताला २-० असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. आणि यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदरर्शनाखाली संघाच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमधील वाढत्या कमकुवतपणावर शिक्कामोर्तब झाले.

गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटीतील ४०८ धावांचा पराभव हा या फॉरमॅटमधील भारताचा (धावांच्या फरकाने) सर्वात मोठा पराभव म्हणून नोंदवला गेला. त्यानंतर झालेल्या एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये प्रोटियाज संघाला अनुक्रमे २-१ आणि ३-१ ने पराभूत करून 'मेन इन ब्लू' संघाने काही प्रमाणात आपला मान राखला आणि वर्षाचा शेवट दिमाखात केला.

गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताची कसोटी क्रिकेटमधील सातत्यहीन कामगिरी २०२६ मध्ये चर्चेचा प्रमुख विषय राहील, त्याचबरोबर संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवण्याचे ध्येयही ठेवेल.टी२० विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धा या दोन्ही स्पर्धांची विजेतेपदे मिळवण्याची संधी असताना, भारतीय संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्याच्या संधीसह नवीन वर्षात प्रवेश करत आहे, त्याच वेळी ते कसोटी क्रिकेटमध्येही संघाची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या रूपाने भावी सुपरस्टारचा उदय

बिहारचा वैभव सूर्यवंशी क्रिकेटमधील सर्वात तेजस्वी नवीन तारा म्हणून उदयास आला आहे. त्याने अवघ्या १४ व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केले आणि स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण पदार्पण करणारा क्रिकेटपटू बनला. तसेच त्याने ३५ चेंडूत शतक झळकावले. जे कोणत्याही भारतीयाने केलेले सर्वात वेगवान शतक आहे.

त्याने वयोगट आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आणि इतिहासातील सर्वात वेगवान युवा एकदिवसीय शतक झळकावले. तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतके करणारा सर्वात तरुण खेळाडू देखील बनला. या दुसऱ्या पराक्रमाने तो इतिहासातील सर्वात तरुण लिस्ट ए शतकवीर ठरला.मैदानाबाहेर, तो २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधला गेलेला भारतीय ठरला आणि त्याला इन्स्टाग्रामवर एक विशेष प्रसिद्धी मिळाली, ज्यामुळे एक किशोरवयीन सनसनाटी म्हणून त्याचा दर्जा अधिकच दृढ झाला.

भारतीय महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक वर्ष

भारतीय महिला संघआने आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ३-० असा विजय मिळवून हंगामाची सुरुवात केल्यानंतर, हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने एप्रिल-मे महिन्यात श्रीलंकेत दक्षिण आफ्रिकेचाही समावेश असलेल्या तिरंगी मालिका जिंकली.

जून-जुलैच्या दौऱ्यावर, भारतीय महिलांनी इतिहास रचला, जेव्हा त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला ३-२ ने हरवून 'लायनेसेस' विरुद्धची पहिली टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली. हरमनप्रीतच्या शतकाने यूकेमध्ये एकदिवसीय मालिकेत २-१ असा विजयही निश्चित केला.त्यानंतर बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर एक कठीण एकदिवसीय मालिका झाली, ज्यात चुरशीच्या लढतीनंतर भारताला २-१ ने पराभव पत्करावा लागला.मात्र, या पराभवामुळे भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

पहिला महिला विश्वचषक विजय

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये, ज्याचे आयोजन भारताने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे केले होते, हरमनप्रीत आणि तिच्या संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये श्रीलंकन ​​आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केले. पण दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध सलग तीन पराभवांमुळे त्या स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या जवळपास करो या मरोच्या परिस्थितीत मिळवलेल्या महत्त्वपूर्ण विजयामुळे, बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना पावसामुळे रद्द होऊनही, भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.मात्र, भारतासमोर अजून सर्वात कठीण आव्हाने यायची होती.

विक्रमी सात वेळा विजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध, जो संघ महिला एकदिवसीय विश्वचषकातील मागील १५ सामन्यांमध्ये अपराजित होता, भारताने जेमिमा रॉड्रिग्सच्या सनसनाटी शतकाच्या जोरावर ३३८ धावांचे स्पर्धेतील विक्रमी लक्ष्य गाठले.

नॉक-आऊट फेरीसाठी दुखापतग्रस्त प्रीतिका रावलच्या जागी संघात आलेल्या शफाली वर्माने, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात ८७ धावांची खेळी करून भारताला सामना जिंकून देणाऱ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली. लॉरा वोल्वार्ड्टच्या शतकानंतरही, दक्षिण आफ्रिकेचा संघ ५२ धावांनी मागे पडला, कारण 'प्लेअर ऑफ द सिरीज' आणि स्पर्धेत २२ बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज दीप्ती शर्माने पाच बळी घेतले.

स्मृती मानधना ४३४ धावांसह स्पर्धेत भारताची सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू ठरली आणि तिच्यासाठी बॅटने गाजवलेल्या या अपवादात्मक वर्षातील कामगिरीत तिने आणखी भर घातली.

२३ एकदिवसीय सामन्यांमध्ये, मानधनाने ६१.९० च्या सरासरीने आणि १०९.९२ च्या धडाकेबाज स्ट्राइक रेटने १३६२ धावा केल्या, ज्यात पाच शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता. तिने २०२५ मध्ये महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू म्हणून वर्षाचा शेवट केला.

मानधनाची धावांची आणि शतकांची संख्या ही महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये एका वर्षात इतर कोणत्याही फलंदाजाने केलेल्या कामगिरीपेक्षा जास्त आहे. या वर्षात, ती या फॉरमॅटमध्ये ५००० धावांचा टप्पा पार करणारी मिताली राज नंतरची दुसरी भारतीय क्रिकेटपटू बनली.

जरी या वर्षातील तिची टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील आकडेवारी आठ सामन्यांमध्ये २६१ धावा या तिच्या नेहमीच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा खूपच कमी असली तरी, ती या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ४००० धावांचा टप्पा पार करणारी न्यूझीलंडच्या सुझी बेट्सनंतर इतिहासातील दुसरी क्रिकेटपटी बनली.

महिला क्रिकेटमध्ये १०,००० धावांच्या प्रतिष्ठित क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी मानधनाने आपलं स्थानही याच वर्षात पटकावलं. आजपर्यंत महिला क्रिकेटमध्ये केवळ तीन फलंदाजांनी म्हणजेच मिताली राज, सुझी बेट्स आणि इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्स यांनी दहा हजार धावांचा टप्पा गाठला आहे.

प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली, २०२५ हे वर्ष भारतीय महिला क्रिकेट संघासाठी खऱ्या अर्थाने प्रगतीचे वर्ष ठरले आहे. अधूनमधून चमकदार कामगिरी करणाऱ्या संघाचे रूपांतर दबावाखाली सातत्यपूर्ण कामगिरी करण्यास सक्षम असलेल्या एका कणखर संघात झाले असे म्हणायला हरकत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande