इंग्लंडचा टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर, जोफ्रा आर्चरला संधी
लंडन, 30 डिसेंबर (हिं.स.)हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघाची २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी, इंग्लंड संघ टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेचा दौ
इंग्लंडचा क्रिकेट संघ


लंडन, 30 डिसेंबर (हिं.स.)हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघाची २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी, इंग्लंड संघ टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेच्या यजमानपदाखाली सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंडने मार्क वुड, गस अ‍ॅटकिन्सन, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ आणि झॅक क्रॉली यासारख्या क्रिकेटपटूंना वगळले आहे.

वेगवान गोलंदाज जोश टँग पहिल्यांदाच इंग्लंडच्या टी-२० संघाचा भाग आहे. त्याने आतापर्यंत फक्त कसोटी सामने खेळले आहेत. जोफ्रा आर्चर टी-२० विश्वचषक संघात आहे पण तो श्रीलंकेला जाणार नाही. तो सध्या दुखापतग्रस्त आहे, त्याला अ‍ॅशेस दरम्यान साईड स्ट्रेनचा त्रास झाला होता. वुड आणि अ‍ॅटकिन्सन देखील दुखापतीमुळे टी-२० विश्वचषक संघाबाहेर आहेत. अ‍ॅशेस दरम्यान दोघेही जखमी झाले होते. खराब फॉर्ममुळे लिव्हिंगस्टोनचा समावेश करण्यात आला नाही.

अष्टपैलू विल जॅक्स इंग्लंडच्या टी-२० संघात परतला आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या न्यूझीलंड दौऱ्याला तो मुकला. वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सची फक्त श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज सोनी बेकर आणि जॉर्डन कॉक्स हे देखील टी-२० संघात आहेत.

इंग्लंड टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये गट क मध्ये बांगलादेश, इटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिजसह आहे. इंग्लंड संघाचा पहिला सामना ८ फेब्रुवारी रोजी मुंबईत नेपाळविरुद्ध आहे. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज, १४ फेब्रुवारी रोजी बांगलादेश आणि १६ फेब्रुवारी रोजी इटलीविरुद्ध सामने होतील.इंग्लंडचा श्रीलंका दौरा २२ जानेवारी रोजी पहिल्या एकदिवसीय सामन्याने सुरू होईल. तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना २७ जानेवारी रोजी आहे. टी-२० मालिका ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान खेळली जाईल. जॅक्सचा विश्वचषक संघात समावेश नव्हता.

२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी इंग्लंडचा टी२० संघ

हॅरी ब्रुक (कर्णधार), फिल साल्ट, बेन डकेट, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, सॅम करन, लियाम डॉसन, विल जॅक्स, आदिल रशीद, जोश टंग, ल्यूक वूड.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande