नाशिक : हरसुल तालुक्यांमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के
नाशिक, 30 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील हरसुल आणि पेठ या दोन तालुक्यांमध्ये आज मंगळवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले असून कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे येथील परिस्थिती वरती प
जिल्ह्यातील पेठ-  हरसुल तालुक्यांमध्ये


नाशिक, 30 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील हरसुल आणि पेठ या दोन तालुक्यांमध्ये आज मंगळवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले असून कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे

येथील परिस्थिती वरती प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाची धक्के बसण्याचे सुरू असून पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जानविल्याची नोंद सीडीओ मेरी येथील भूकंप मापन केंद्रामध्ये झाली आहे . याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यामध्ये असलेल्या मौजे उस्थाळे या ठिकाणी मंगळवारी सकाळी 9.25 वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जानविले आहेत तर हरसुल तालुक्यामध्ये देखील सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणविले आहे ज्यावेळी नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणविले त्यावेळी तातडीने पेठ आणि हरसुल येथील तहसील कार्यालयाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे पेठ आणि हरसुल या ठिकाणी नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून नागरिक भयभीत झालेले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद निवासी उपजिल्हाधिकारी रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती निवारण अधिकारी देशपांडे तसेच या विभागातील प्रांत व तहसीलदार येथील परिस्थिती वरती लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केलेले आहे या ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande