
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.) । अमरावती महापालिका निवडणुकीत 87 जगांसाठी 1021 नामांकन अर्ज दाखल झाले आहे. या अर्जांच्या छाननीलाआज, बुधवारपासून सुरूवात झाली आहे. त्यानंतर २ डिसेंबरला उमेदवारांना नामांकन परत घेण्याचा अंतिम दिनांक आहे. तर ३ डिसेंबरला चिन्ह वाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे.
आता सर्व राजकीय पक्षांसमोर बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांची मनधरणीचे प्रयत्न जोमाने सुरू होणार आहेत. अमरावती महापालिका निवडणुकीसाठी नामांकनाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारला सातही झोनवर नामांकन उचल आणि भरणाऱ्यांची समर्थकांसह मोठी गर्दी उसळली होती. शेवटच्या दिवस अखेर सातही झोनमध्ये ८७ जागांसाठी सुमारे १०२१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. तर २३ ते ३० डिसेंबरपर्यंत एकूण ३०७८ नामांकनाची उचल करण्यात आली. बुधवार ३१ डिसेंबर ला सकाळी ११ वा. पासून नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. तर २ जानेवारीला सकाळी ११ ते ३ वा. पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे. विशेष म्हणजे मंगळवारला अनेक दिग्गज नेते व माजी पदाधिकाऱ्यांनी नामांकन दाखल केले. शेवटच्या दिवस अखेर विशेष म्हणजे झोन १ मधून १७१ , झोन -२ मधून १३८, झोन ३ मधून १४८, झोन ४ मधून २०५, झोनपाच मधून १२६, झोन ६ मधून ८१ आणि झोन ७ मधून १५२ अशा एकूण १०२१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
यामध्ये सर्वाधिक नामांकन झोन ४ मध्ये २०५ इच्छुकांनी फॉर्म भरले. तर सहा दिवसात झोन १ मधून ४४१, झोन-२ मधून ४०२, झोन ३ मधून ४७९, झोन ४ मधून ४५५ , झोन पाच मधून ४४५, झोन ६ मधून २७१ आणि झोन ७ मधून ५८५ अशा एकूण ३०७८ इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची उचल केली. सातही झोनवर तुफान गर्दी मंगळवारला नामांकन दाखल करण्यासाठी आणि उचल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे राजकीय पक्षाचे व स्वतंत्र इच्छुकांनी सातही झोनवर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. नामांकनाची वेळ झाल्यानंतर संबंधितांना कूपन देण्यात आले होते. त्यानंतर रात्री पर्यंत नामांकन प्रक्रिया सुरु होती. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी