
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)
काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र उमेदवारांची निवड करताना अनेक पक्षांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाल. अशातच अमरावतीत तिकीट वाटप करताना भाजपलाही तारेवरची कसरत करावी लागली त्यामुळे अनेक कार्यकर्ते दुखावले तर काही कार्यकर्ते नाराज असून काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. मात्र भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष श्रद्धा गहिलोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही नसून भाजपने पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा खळबळजनक आरोप केल्याने सर्वत्र खळबळ झाली आहे. 2018 पासून मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे. मोर्चे असो किंवा महिलांना आंदोलनासाठी गोळा करणे असो याशिवाय पक्षासाठी खर्च करणे असो यासाठी मी कधीही मागे हटली नाही तरीही मला तिकीट न करण्यात आला आहे. भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे असे म्हणतात मात्र कार्यकर्त्याला इथे न्याय मिळत नाही. पक्षात नवीन लोक आलेले आहे. भाजपने अशा नवीन लोकांना तिकीट दिले आहे. एवढेच नाही तर भाजपने पैसे घेऊन लोकांना तिकीट दिले आहे त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी काय करायचे असा सवाल भाजपच्या श्रद्धा गहलोत यांनी पक्षश्रेष्ठींना विचारला आहे. त्यामुळे आता अमरावती भाजपात पक्षांतर्गत बंडखोरी वाढण्याची चिन्ह आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी