
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)
धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही पुस्तकांचा पुरवठा न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
आश्रमशाळांमधील इयत्ता ९ वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले. परीक्षा उंबरठ्यावर आल्या तरी पुस्तकेच उपलब्ध नसल्याची गंभीर व धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून ही स्थिती म्हणजे शासनाच्या शिक्षण व्यवस्थेची मोठी शोकांतिका असल्याची भावना व्यक्त होत आहे.धक्कादायक बाब म्हणजे काही आश्रमशाळांमध्ये पुस्तके नसण्यासोबतच शिक्षकही उपलब्ध नाहीत. शिक्षक आणिपुस्तकांशिवाय शिक्षण कसे दिले जात आहे, असा संतप्त सवाल पालक व समाजातून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष अशा अराजक स्थितीत जात असल्याने त्यांच्या भवितव्याशी थेट खेळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या दरवर्षी मंजूर केला जातोः मात्र प्रत्यक्षात हा शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी निधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. उलट दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च न होता परत जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. आदिवासी येणारा निधी नेमका कुठे खर्च होत आहे, हा आश्रमशाळांतील साधनसामग्री व शैक्षणिक सुविधांसाठी प्रश्न ऐरणीवर आला आहे. कागदोपत्री दाखवण्यात येणाऱ्या खर्चामध्ये आणि प्रत्यक्ष शाळांतील परिस्थितीत मोठी तफावत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
यासंदर्भात अधिकाऱ्याऱ्यांना विचारणा केली असता, 'आयुक्तांकडे पाठ्यपुस्तके व जात आहे; मात्र केवळ मागण्या पाठवून गाईडसाठी मागणी केली आहे', असे उत्तर दिले महिनोमहिने वेळकाढूपणा केल्याने या प्रक्रियेत मोठ्याप्रमाणावर पाणी मुरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या वेळकाढू अधिकारी आपल्या स्वार्थासाठी सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत असते, तर दुसरीकडे निष्काळजी व देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारमय करत असल्याचा आरोप पालक, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.करून दोषींवर कारवाई करावी, तसेच उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन विद्यार्थ्यांना तत्काळ पुस्तके, गाईड व शिक्षक या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी छेडण्याचा इशारा आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्याऱ्यांनी दिला आहे.
मी स्वतः बिजुधावडी आश्रमशाळेला भेट दिली. त्यादरम्यान विद्यार्थ्यांकडे पुस्तके नव्हते. यासाठी आयुक्तांकडे मागणी केली. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. - सिद्धार्थ शुक्ला प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प धारणी.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी