अमरावती : आंतरराज्यीय नायडू गॅगचा सराईत चोर गजाआड
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)।राजापेठ व सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्याहद्दीत चार चाकी वाहनाच्या काचा फोडून रोकड व लॅपटॉप चोरण्याच्या चार ते पाच घटना २१ डिसेंबरला घडल्या होत्या. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय टोळीशी जुळलेल्या एका आरोपील
आंतरराज्यीय नायडू गॅगचा सराईत चोर गजाआड कारच्या काचा फोडून चोरी करण्यात पटाईत


अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)।राजापेठ व सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्याहद्दीत चार चाकी वाहनाच्या काचा फोडून रोकड व लॅपटॉप चोरण्याच्या चार ते पाच घटना २१ डिसेंबरला घडल्या होत्या. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय टोळीशी जुळलेल्या एका आरोपीला गजाआड केले आहे. कार्तिक बालू नायडू (27, वाकीपाड़ा, नंदुरबार) हे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसारकाही दिवसांपूर्वी कारच्या काचा फोडून रोख रक्कम व लॅपटॉप चोरीला गेल्याच्या

घटना उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणी राजापेठ आणि सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या चोरीची पध्दत एकसारखी असलयामुळे या घटना एखाद्या टोळीच्या असू शकतात अशी शक्यता प्राथमिक तपासात व्यक्त क रण्यात आली होती. घटनास्थळांचे सिसिटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले होते. तांत्रीक व गोपनिय माहितीच्या आधारावर हे सत्य समोर आले की, या चोऱ्या नंदुरबार जिल्हयातील कुख्यात नायडू गँगमधील आरोपींनी केल्या. या टोळीतील एक आरोपी बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी सापळा रचून आरोपी कार्तिक बालू नायडू (27) याला ताब्यात घेतले.राजापेठ आणि सिटी कोतवाली हद्दीत त्याच्या दोन साथीदारांसह चोऱ्या केल्या. दोन फरार साथीदारांचा शोध सुरु आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande