
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)
भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदनेसाठी अमरावती शहर सज्ज झाले असून, सायन्सकोर मैदानावर उद्यापासून तीन दिवस भव्य, ऐतिहासिक व विश्वविक्रमी मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, सुमारे दोन लाख भीमसैनिकांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती आयोजक प्रमुख कैलास मोरे यांनी सायन्स कोर मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या या मानवंदना कार्यक्रमाचे यंदाचे आयोजन समता सैनिक दल व माजी सैनिक संघटना व मानवंदना आयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. सायन्सकोर मैदान येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून पंचशील ध्वज असलेले मोठे धम्मपीठ तसेच व्हीआयपी आसन व्यवस्था, सत्कारमूर्तीसाठी विशेष बसण्याची व्यवस्था तसेच मानवंदना साठी उपस्थित राहणाऱ्या अनुयायांसाठी प्रशस्त आसनव्यवस्था, बाहेरठिकाणाव रून येणऱ्या अनुयायांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था, याशिवाय धम्मसाहित्य, पुस्तके यांसाठी पन्नास स्टॉल, दुचाकी, रोषणाई चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, आकर्षक याठिकाणी करण्यात आली आहे. सन १८१८ च्या ऐतिहासिक भीमा कोरेगाव शौर्यगाथेतील लढाईचे सरसेनापती सिध्दनाक महार यांचे १२ वे वंशज मिलिद इनामदार (कळंबी) हे यावर्षी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी