अजमेर दर्ग्याला बॉम्बने उडवण्याची धमकी
नवी दिल्ली , 4 डिसेंबर (हिं.स.)।अजमेर दर्ग्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आज, गुरुवारी दुपारी बॉम्ब लावल्याची धमकी देणारा मेल जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली, या मेलमध्ये असा दावा करण्यात आला होता की अजमेर
अजमेर दर्ग्याला बॉम्बने उडवण्याची धमकिचा ईमेल


नवी दिल्ली , 4 डिसेंबर (हिं.स.)।अजमेर दर्ग्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आज, गुरुवारी दुपारी बॉम्ब लावल्याची धमकी देणारा मेल जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली, या मेलमध्ये असा दावा करण्यात आला होता की अजमेर जिल्हाधिकारी कार्यालय आणि गरीब नवाज दर्ग्यात ४ आरडीएक्स आयईडी ठेवण्यात आले आहेत, जे पुतिन येथे येताच स्फोट करतील. मेल समोर येताच जिल्हा प्रशासन, अजमेर पोलिस, बॉम्ब डिस्पोजल पथक आणि गुप्तचर यंत्रणा तात्काळ सक्रिय झाल्या आणि शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला.

या घटनेची सूचना मिळताच सर्वप्रथम दर्गाह शरीफ परिसर तात्काळ रिकामा करण्यात आला. दुपारी सुमारे १ वाजल्यापासून यात्रेकरूंना प्रवेश बंद करण्यात आला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दर्गाहच्या प्रत्येक भागाची नाकेबंदी करून मेटल डिटेक्टर, डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब निष्क्रिय पथकाच्या मदतीने सखोल तपासणी सुरू केली. जवळपास अडीज तास चाललेल्या शोध मोहिमेत दर्गाहचा कोना-कोना तपासण्यात आला, परंतु कोणताही बॉम्ब किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही.

अंजुमन सैयद जादगानचे सचिव सैयद सरवर चिश्ती यांनी सांगितले की दर्गाह सीओ लक्ष्मण राम यांना धमकीबाबत कळताच अंजुमनच्यावतीनेही परिसर रिकामा करण्यास आणि यात्रेकरूंना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यास पूर्ण सहकार्य करण्यात आले. त्यांनी सांगितले की आगामी उर्स लक्षात घेता सुरक्षा आधीच कडक करण्यात आली आहे आणि या घटनेनंतर सुरक्षेत आणखी कडकपणा आणण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही पोलिसांनी तातडीने मोर्चा सांभाळला. सर्व कर्मचारी आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आले आणि कार्यालयाचा प्रत्येक भाग तपासण्यात आला. जवळपास एक तास चाललेल्या तपासणीत येथेही कोणतीही संशयास्पद सामग्री सापडली नाही. या काळात संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता.

अजमेर अॅडिशनल एसपी ग्रामीण डॉ. दीपक कुमार शर्मा यांनी सांगितले की जिल्हाधिकार्यांना मिळालेल्या मेलच्या आधारावर दोन्ही संवेदनशील ठिकाणी व्यापक शोध मोहीम राबवण्यात आली. त्यांनी सांगितले, “आम्ही दर्गाह आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रत्येक कोपरा तपासला. दोन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या मोहीमेत कोणतेही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्यात आले आहे.”

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी. दर्गाहमधील सुरक्षा निश्चित झाल्यानंतर संध्याकाळी यात्रेकरूंचा प्रवेश पुन्हा सुरू करण्यात आला. तपासणीदरम्यान मोठ्या संख्येने लोक बाहेर अडकून पडले आणि गैरसोयीला सामोरे जावे लागले, तरीही सर्वांनी सुरक्षेच्या कारणास्तव सहकार्य केले.अजमेरमध्ये आगामी उर्स लक्षात घेता या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. पोलिस मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत आणि संपूर्ण प्रकरणाची सायबर तपासणी सुरू करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande