भारताने श्रीलंकेला पाठवले मूवेबल मॉड्युलर ब्रिज सिस्टम आणि शेकडो वॉटर प्युरिफिकेशन युनिट्स
नवी दिल्ली , 4 डिसेंबर (हिं.स.)। चक्रीवादळामुळे प्रभावित शेजारी राष्ट्र श्रीलंकेची भारत सर्वतोपरी मदत करत आहे. आवश्यक सेवा पुनर्संचयित करण्यासाठी मानवतावादी मदतीच्या अंतर्गत भारताने मूवेबल मॉड्युलर ब्रिज सिस्टम तसेच शेकडो वॉटर प्युरिफिकेशन युनिट्स
भारताने श्रीलंकेला पाठवले मूवेबल मॉड्युलर ब्रिज सिस्टम आणि शेकडो वॉटर प्युरिफिकेशन युनिट्स


नवी दिल्ली , 4 डिसेंबर (हिं.स.)। चक्रीवादळामुळे प्रभावित शेजारी राष्ट्र श्रीलंकेची भारत सर्वतोपरी मदत करत आहे. आवश्यक सेवा पुनर्संचयित करण्यासाठी मानवतावादी मदतीच्या अंतर्गत भारताने मूवेबल मॉड्युलर ब्रिज सिस्टम तसेच शेकडो वॉटर प्युरिफिकेशन युनिट्स श्रीलंकेला पाठवले आहेत. भारतीय दूतावासाने गुरुवारी याबाबत माहिती दिली.

भारतीय उच्चायुक्तालयाने एका निवेदनात सांगितले की कोलंबोच्या विनंतीनुसार भारतीय हवाई दलाचे सी-17 ग्लोबमास्टर हे वाहतूक विमान ५०० वॉटर प्युरिफिकेशन युनिट्स आणि मूवेबल मॉड्युलर ब्रिज सिस्टमसह श्रीलंकेत पोहोचले आहे. या ब्रिज सिस्टमच्या मदतीने आता अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या भागांमध्येही मदत पोहोचवणे शक्य होईल. त्यामुळे पुर आणि भूस्खलनग्रस्त भागांमध्ये आपत्कालीन सेवांसाठी मदत पोहोचवणे सुलभ होणार आहे.

उच्चायुक्तालयाने सांगितले की विमानात २२ लोक होते, ज्यात पूल उभारणीसाठी तज्ज्ञ अभियंते आणि आधीपासून तैनात फील्ड हॉस्पिटलला मदत करण्यासाठी एक वैद्यकीय पथकही समाविष्ट होते. भारत ‘ऑपरेशन सागर बंधु’ अंतर्गत श्रीलंकेला मानवतावादी मदत पुरवत आहे, ज्यामध्ये प्रभावित लोकांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हवाई, समुद्री आणि जमिनीवरील मोहिमा राबवल्या जात आहेत.

नॅशनल डिसास्टर रिलीफ सर्व्हिसेस सेंटर (एनडीआरएससी)चे सहाय्यक सचिव जयतिस्सा मुनासिंघे यांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीपर्यंत ४.५५ लाखांहून अधिक कुटुंबांतील १.६ दशलक्षाहून अधिक लोक अडकून पडले होते. सरकार १,३४७ मदत केंद्रे चालवत आहे, ज्यामध्ये १,८८,000 हून अधिक लोक राहतात. अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की चक्रीवादळामुळे एकूण ६ ते ७ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले असून ते देशाच्या जीडीपी च्या सुमारे ३ ते ५ टक्के इतके आहे.

दरम्यान, श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दित्वाह’ने प्रचंड विध्वंस केला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जिल्हे पूर्णपणे वेगळे झाले आहेत, जिथे मदत पोहोचणे कठीण झाले आहे. चक्रीवादळ दित्वाहमुळे आलेल्या भीषण पुर आणि भूस्खलनात बुधवारी संध्याकाळपर्यंत किमान ४७९ जणांचा मृत्यू झाला असून ३५० जण बेपत्ता आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande