दिल्ली-एनसीआर प्रदूषणाच्या समस्येविरोधात विरोधकांचे संसद भवन परिसरात आंदोलन
नवी दिल्ली , 4 डिसेंबर (हिं.स.)। विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी संसद भवन परिसरात राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गंभीर हवामान-प्रदूषणाच्या समस्येविरोधात आंदोलन केले.या आंदोलनात सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते.
दिल्ली-एनसीआर प्रदूषणाच्या समस्येविरोधात विरोधी पक्षांच्या नेत्यांचे संसद भवन परिसरात आंदोलन


नवी दिल्ली , 4 डिसेंबर (हिं.स.)। विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी संसद भवन परिसरात राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गंभीर हवामान-प्रदूषणाच्या समस्येविरोधात आंदोलन केले.या आंदोलनात सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते. यावेळी शहरातील वायु-प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली.

अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसद भवनाच्या मकर द्वाराबाहेर हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली आणि पंतप्रधानांनी केवळ निवेदने देणे थांबवून प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी केली. वायु-प्रदूषणाची भीषणता दाखवण्यासाठी काही खासदारांनी प्रतीकात्मकरीत्या मास्कही घातले होते. आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, “लोक मरत आहेत—मुलं मरत आहेत. माझ्यासारख्या वयस्कर लोकांनाही त्रास होत आहे. त्यामुळे काहीतरी करणं ही सरकारची जबाबदारी आहे.”

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या की वायु-प्रदूषण हा राजकीय मुद्दा नाही आणि ते या विषयावर चर्चा तसेच ठोस कारवाईची मागणी करत आहेत. त्या म्हणाल्या, “वायु-प्रदूषण हा कोणताही राजकीय मुद्दा नाही. सरकारने ठोस कृती केली पाहिजे; आपण सर्वजण या प्रश्नावर एकत्र आहोत. लोक प्रचंड त्रस्त झाले आहेत.”

प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या, “बाहेरची परिस्थिती पाहा. सोनिया जी म्हणाल्या तशी, मुलांना श्वास घेता येत नाही. त्यांना दमा होत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनाही श्वास घेण्यात अडचण येत आहे. परिस्थिती वर्षागणिक अधिकच खराब होत चालली आहे. दरवर्षी फक्त निवेदने दिली जातात, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नाही. आम्ही सर्वांनी सांगितले की सरकारने कृती करायलाच हवी आणि आम्ही सगळे त्यांच्यासोबत उभे आहोत. हा असा राजकीय मुद्दा नाही की आपण एकमेकांवर बोट ठेवावे.”

काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले, “मी आज काम रोको प्रस्ताव दिला आहे. दिल्लीमध्ये AQI ४०० आहे, लोकांची स्थिती दयनीय आहे. मुलांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हे आरोग्याच्या दृष्टीने मोठं संकट आहे. यावर संसदेत चर्चा होणे आवश्यक आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande