
नवी दिल्ली , 4 डिसेंबर (हिं.स.)। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत दौर्यावर येण्यापूर्वी अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफबाबत मोठे विधान केले आहे. अमेरिका टॅरिफच्या माध्यमातून भारतावर दबाव टाकत आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना पुतिन म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दबावाखाली येणारे नेते नाहीत.
एका मुलाखतीत पुतिन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत होणारी द्विपक्षीय चर्चा आणि भारत–रशिया संबंधांचे भवितव्य याबद्दलही विचारण्यात आले. यावर उत्तर देताना पुतीन यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा करत म्हटले की जगाने भारताचे अटल धोरण पाहिले आहे आणि देशाने आपल्या नेतृत्वाचा अभिमान बाळगायला हवा.
पुतिन यांनी हेही सांगितले की भारत आणि रशिया यांच्यातील 90 टक्क्यांहून अधिक द्विपक्षीय व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत.पुढे ते म्हणाले की आपल्या मित्र पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी भारतात प्रवास करताना त्यांना खूप आनंद होत आहे. दोन्ही नेत्यांनी पुढील बैठक भारतात आयोजित करण्यावर सहमती दर्शविल्याचेही त्यांनी सांगितले. पुतिन म्हणाले की चर्चेसाठी बऱ्याच गोष्टी आहेत, कारण भारत आणि रशियामधील सहकार्याचा व्याप अत्यंत व्यापक आहे. त्यांनी दोन देशांमधील विशिष्ट ऐतिहासिक नातेसंबंधांवरही प्रकाश टाकला. भारताने स्वातंत्र्यानंतर केलेल्या प्रगतीचे कौतुक करत पुतिन म्हणाले की अवघ्या ७७ वर्षांच्या कालावधीत देशाने विलक्षण विकास साधला आहे.
पुतिन आतापर्यंत भारताचे नऊ दौर्यावर आले आहेत, ज्यापैकी तीन भेटी मोदी यांच्या कार्यकाळात (२०१६, २०१८ आणि २०२१) झाल्या. डिसेंबरमध्ये त्यांचा दहावा दौरा होणार आहे. तर पंतप्रधान मोदी सात वेळा रशियाला भेट देऊन आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode