रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन नवी दिल्लीत दाखल
नवी दिल्ली , 4 डिसेंबर (हिं.स.)। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीत पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर त्यांचे स्वागत केले. पुतिन यांच्या सन्मानार्थ विमानतळावर संगीत आणि नृत
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन नवी दिल्लीत दाखल


नवी दिल्ली , 4 डिसेंबर (हिं.स.)। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीत पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर त्यांचे स्वागत केले. पुतिन यांच्या सन्मानार्थ विमानतळावर संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वागत कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन एकाच कारमध्ये बसून विमानतळावरून रवाना झाले. गेल्या तीन महिन्यांत ही दुसरी वेळ आहे जेव्हा मोदी आणि पुतिन एकाच कारमध्ये बसले आहेत.

कारमध्ये एकत्रित प्रवास करून ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. या उबदार स्वागताने आणि सामायिक प्रवासाने जगाला स्पष्ट संदेश मिळाला की भारत-रशिया संबंध खूप खोल, विश्वासार्ह आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

यूक्रेन युद्धानंतर ही पुतिन यांची पहिली भारत भेट आहे. अध्यक्ष पुतिन आज पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चेत सहभागी होतील. त्यानंतर ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित अनौपचारिक रात्रीच्या भोजनास उपस्थित राहतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ डिसेंबरला पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केले जाईल. त्यानंतर ते राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करतील.पुढे ते हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय बैठक आणि प्रतिनिधीमंडळ पातळीवरील चर्चेत सहभागी होतील. या बैठकीत काही प्रमुख उद्योगपतीही सहभागी होण्याची शक्यता आहे. यानंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन भारत-रूस बिझनेस फोरममध्येही सहभागी होतील. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रणावरून पुतिन राष्ट्रपती भवनातील भोजसाठी उपस्थित राहतील.या कार्यक्रमांनंतर अध्यक्ष पुतिन मॉस्कोकडे परत प्रयाण करतील.

याआधी सप्टेंबरमध्ये शांघायीत पंतप्रधान मोदी आणि पुतिन एकाच कारमध्ये बसून शिखर संमेलनात सहभागी झाले होते, तेव्हा जागतिक कूटनीतीच्या सर्व औपचारिकता मागे ठेवण्यात आल्या होत्या. आज पुन्हा एकदा दोघे नेते एकाच कारमध्ये दिसले. मोदी आणि पुतिन यांच्या या भारत दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande