श्रीलंकेत चक्रीवादळ दित्वाहमुळे हजारो घरे उद्ध्वस्त; भारत पुनर्बांधणीस मदत करणार
नवी दिल्ली , 5 डिसेंबर (हिं.स.)।श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दित्वाह’ मुळे ४८६ जणांचा मृत्यू झाला असून हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. चक्रीवादळनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पूर, भूस्खलन आणि विस्थापनाची समस
श्रीलंकेत चक्रीवादळ दित्वाहमुळे हजारो घरे उद्ध्वस्त; भारत पुनर्बांधणीस मदत करणार


नवी दिल्ली , 5 डिसेंबर (हिं.स.)।श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दित्वाह’ मुळे ४८६ जणांचा मृत्यू झाला असून हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. चक्रीवादळनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पूर, भूस्खलन आणि विस्थापनाची समस्या अद्याप कायम आहे. अशा कठीण वेळी भारताने श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला आहे.भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांनी श्रीलंकेचे गृहनिर्माण आणि बांधकाम मंत्री सुसील रानासिंघे यांची भेट घेतली. या भेटीत चक्रीवादळामुळे झालेल्या मोठ्या विध्वंसावर आणि पुनर्निर्माणाच्या गरजांवर सविस्तर चर्चा झाली.

उच्चायुक्त संतोष झा यांनी शुक्रवारी एक्सवर पोस्ट करताना लिहिले की, चक्रवात दित्वाहनंतर पुनर्वसन आणि पुनर्निर्माणाच्या गरजांवर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. तसेच श्रीलंकेतील गृहनिर्माण क्षेत्रात भारत–श्रीलंका विकास सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवरही विचारविनिमय झाला.शुक्रवारी सकाळी श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार, १६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या भीषण पावसामुळे निर्माण झालेल्या पूर आणि भूस्खलनांमध्ये ४८६ जण मृत झाले असून ३४१ जण बेपत्ता आहेत.

आकडेवारीनुसार २,३०३ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत तर ५२,४८९ घरे नुकसानग्रस्त झाले आहेत. भारत ‘ऑपरेशन सागर बंधु’ अंतर्गत श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावर मानवी मदत पुरवत आहे. हवाई, नौदल आणि जमिनीवरील संयुक्त ऑपरेशन्सच्या माध्यमातून प्रभावित लोकांना तात्काळ मदत पोहोचवली जात आहे. ही मदत दोन्ही देशांतील मैत्री आणि मानवीय सहकार्याचे प्रतिक मानली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande