आरबीआयची घोषणा : रेपो दरात २५ बीपीएसने कपात; नवा दर 5.25 टक्के
मुंबई, 5 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय रिझर्व्ह बँकेने मौद्रिक धोरण बैठकीत निर्णय घेत रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची कपात जाहीर केली असून हा दर ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही कपात तात्काळ प्रभावा
RBI Governor Sanjay Malhotra


मुंबई, 5 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय रिझर्व्ह बँकेने मौद्रिक धोरण बैठकीत निर्णय घेत रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची कपात जाहीर केली असून हा दर ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही कपात तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे गृहकर्जांसह इतर कर्जांच्या व्याजदरांमध्ये घट होण्याची शक्यता असून ग्राहकांच्या ईएमआयमध्ये दिलासा मिळेल. बँकांकडूनही आता कमी व्याजदरांवर कर्जे उपलब्ध होऊ शकतात.

सहा सदस्यीय मौद्रिक धोरण समितीने (एमपीसी) रेपो दरात कपात करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. यासोबतच तरलता व्यवस्थापनासाठी काही बदल करण्यात आले असून कॅश रिझर्व्ह रेश्यो (सीआरआर) ३ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. सिक्युरिटी डिपॉझिट फंड (एसडीएफ) दर ५.२५ टक्के, तर मॉर्गेज सपोर्ट फंड (एमएसएफ) आणि बँक दर ५.७५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

आर्थिक प्रणालीत पुरेशा तरलतेसाठी आरबीआयने या महिन्यात १ लाख कोटी रुपयांच्या ओपन मार्केट ऑपरेशन (OMO) खरेदीची आणि ५ अब्ज डॉलरच्या तीन वर्षांच्या USD/INR स्वॅपची घोषणा केली आहे. या उपाययोजनांमुळे बाजारातील स्थैर्य राखण्यास मदत होईल, असे आरबीआयने स्पष्ट केले.

चालू वर्षात रेपो दरात झालेल्या हे चौथ्या कपाती आहे. फेब्रुवारीत २५ बेसिस पॉइंट, एप्रिलमध्ये २५ बेसिस पॉइंट, जूनमध्ये ५० बेसिस पॉइंट आणि आता डिसेंबरमध्ये पुन्हा २५ बेसिस पॉइंट इतकी घट करण्यात आली असून एकूण १.२५ टक्क्यांची कपात झाली आहे. यापूर्वी या वर्षात दोन वेळा रेपो दर स्थिर ठेवण्यात आला होता.

आरबीआय गव्हर्नरांनी सांगितले की मागील महिना आव्हानात्मक असला तरी पुढील काळात देशाची जीडीपी वाढ आणि महागाई दर नियंत्रित पातळीवर राहण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ ८.२ टक्के नोंदली गेली असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ८ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजारात तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. सेंसेक्स २०० पेक्षा अधिक अंकांनी वाढून ८५,५०० च्या पुढे गेला असून निफ्टी ७५ अंकांनी वाढून २६,११० वर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही ३६४ अंकांची मजबुती दिसून आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande